You are currently viewing श्री बनशंकरी पंत संस्थेच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश : वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

श्री बनशंकरी पंत संस्थेच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश : वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

विटे शहरातील जनसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या श्री बनशंकरी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात संपन्न झाली. विषयपत्रीकेवरील सर्व विषय सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमताने संमत केले.यावेळी सभासदांनी सुचविलेल्या सूचनांचा स्विकार करुन यापुढे कामकाजात आणखी प्रभावीपणा आणला जाईल. अशी ग्वाही संस्थेच्या वतीने संस्थापक किरण तारळेकर यांनी दिली.

स्वागत प्रास्तावीक अध्यक्ष दिलीप टेके यांनी केले.या वर्षी संस्थेस अकरा लाख रुपये निव्वळ नफा झाला असून सभासदांना १० टक्के लांभाश दिला जाईल या संचालक मंढळाच्या ठरावास सभासदांकडुन टाळ्यांच्या गजरात मान्यता देण्यात आली.सोनेतारण कर्जाची सोय संस्थेच्या वतीने सुरु केली असुन सभासदांनी गरजेनुसार त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक किरण तारळेकर यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय ,खाजगी व सहकारी बॅंकांच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पतसंस्थाना मोठा संघर्ष करावा लागत असुन यापुढच्या काळात पतसंस्थांनी विश्वासार्हता टिकवत असतानाच आपसातील व्याजस्पर्धा थांबवुन हळु हळु बॅंकांच्या व्याजदराशी मिळतेजुळते व्याजदर कसे करता येतील याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगीतले.यानंतर महादेव कुरकुटे यांनी आभार मानले. किरण तारळेकर,दिलीप टेके,सुरेश म्हेत्रे,उत्तमराव चोथे,महादेव कुरकुटे,संजय म्हेत्रे, शशीकांत तारळेकर, शशीकांत म्हेत्रे,राजु चौगुले,नितांत तारळेकर,नितीन म्हेत्रे ,मुरारी लोटके,निळकंठ भस्मे,प्रसाद दिवटे,पियुष म्हेत्रे,सुयश म्हेत्रे,किरण म्हेत्रे, राम तारळेकर यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा