You are currently viewing आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*

*आषाढी एकादशी*
******************
आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. कारण मनुष्याचे एक वर्ष म्हणजे भगवंताची एक रात्र असते . दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र असते तर उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस असतो . आषाढ महिन्यात कर्क संक्रातीला उत्तरायण पूर्ण होते व दिवस संपतो त्यानंतर दक्षिणायन म्हणजे भगवंताची रात्र सुरू होते. त्यामुळे भगवंताच्या निद्राकाळात असुरी प्रवृतींचा किंवा असुरी शक्तींचा प्रादुर्भाव वाढतो त्या पासून रक्षण होत रहावे म्हणून प्रत्येक व्यक्तीने साधना करावी व पापमुक्त व्हावे या उद्देशाने आषाढी , कार्तिकीचे व्रत करावे अशी पूर्वीपासून प्रथा आहे. म्हणून त्या एकादशीला *आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी म्हटले जाते.*

या आषाढी एकादशी तिथीला अनादीकालापासून अत्यन्त महत्व आहे आणि या आषाढी व कार्तिकी एकादशी बद्दल अनेक पौराणिक कथेतून संतवाङ्मयातून , संतसाहित्यातुन महात्म्य सांगितलेले आहे.
आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही एकादशा या दोन्ही महिन्यांच्या शुद्ध एकादशीला होत असतात आणि ही प्राचीन वारीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा सुमारे आठशे वर्षांपूर्वी पासून सुरू असून महाराष्ट्रातुन व कर्नाटकातून असंख्य म्हणजे लाखो लोक अत्यन्त श्रद्धेने विठ्ठल नामाचा अखंड गजर करीत पंढरपूरला म्हणजे ज्याला *भूधरीचा स्वर्ग समजले जाते त्या पुण्यपावन असलेल्या पंढरपूर या भूमीत येत असतात*
पृथ्वीवरील या भरतभुमीत प्रत्यक्ष भगवंताने , परमेश्वराने जन्म घेतला आहे , ऋषी , मुनी , संतही येथे होवून गेले आहेत असे दृष्टांत आपल्या समोर आहेत. भारतीय धर्मग्रंथातुन याबद्दल मोठ्या प्रमाणात दृष्टांत दिले असून *रामायण , महाभारत , विष्णूपुराण , भागवत धर्म , भगवत गीता , ज्ञानेश्वरी , तुकाराम गाथा , एकनाथी भागवत , दासबोध या सर्व ग्रंथातून भारतीय अध्यात्म , भारतीय परंपरा , श्रद्धा , सण , उत्सव यांचे दृष्टांतासह विवेचन केले आहे.*
त्या उत्सवांपैकी *आषाढी आणि कार्तिकी एकादशी* हे वैष्णवी संप्रदायाच्या , भागवत धर्माच्या भक्तीपूर्ण भावनांचे आणि सामाजिक ऐक्याचे महत्व ( महात्म्य ) सांगणारा आणी भारतीय परंपरेतील निष्पाप मानवतेचा आणी भगवंताशी एकरूप होवून , तल्लीन होवुन अत्यन्त श्रद्धेने विठ्ठल , विठुमाऊली , विठोबा , विठुराया , पंढरीनाथ या पांडुरंगाचा *जय जय विठोबा रखुमाई असा नावाचा गजर करीत ,धावा करीत ही पांडुरंगाची पायी चालत जाण्याची वारीची परंपरा फार प्राचीन काळापासून अखंड चालू आहे.*
असा हा विठ्ठल म्हणजेच भगवंत विष्णूचा , कृष्णाचाच अवतार मानला जात असून *वैष्णवी , वारकरी , भागवत धर्माचे मुख्य दैवत मानले गेले आहे. बहुअंशी भारतातील महाराष्ट्र् आणि कर्नाटक राज्यातून विठ्ठलाची पूजा अत्यन्त श्रद्धेने , तन्मयतेने भक्तीपूजा सातत्याने केली जाते.*
आणि तो विठ्ठल , विठुराया म्हणजे भागवत धर्म , वैष्णव , वारकरी , आणि हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत मानले जाते.

*विठुमाऊली म्हणजे द्वैत अद्वैताचे मिलन ( एकरूपता ) तिथे तू अन मी वेगळा नाही , अपपर हा दुजा भाव नाही फक्त परस्पर प्रेमभाव असतो.*

आषाढी एकादशी म्हणजे नक्की काय किंवा ती कां करावी असाही प्रश्न प्रत्येक भाविकाच्या मनात येतो खरा.
पण या व्रतामध्ये सर्व देवदेतांचे तेज एकवटलेले आहे अंतर्भूत आहे आणि त्याला अनन्यसाधारण महत्व आहे.
*भुधरीचा स्वर्ग असलेल्या या पंढरपूरच्या पुण्यपावन पवित्र भूमीत परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात पुरावा मिळतो. आणि वैकुंठभुमीच्या आधीपासून हे पंढरपूर पुरातन तीर्थक्षेत्र अस्तित्वात आहे असे मानले जाते.*
ही वारीची परंपरा सुमारे आठशे वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. लाखो भावीक विठुमाऊलीचा गजर करीत दिंड्या , पताका , टाळ , मृदंग , वीणा , चिपळ्या , अभंग , कीर्तन , भारुड , यांच्या ब्रह्मनादात अत्यन्त उत्साहाने नाचत , नाचत विठ्ठलाचा अखंड नामघोष करीत पंढरीच्या वाळवंटात आपलं सर्वस्व विसरून तल्लीन होवून भक्तिरसात डुंबून जातात या वारीत , दिंडीत आज सर्वच संतांच्या पालख्या सामील होतात आणि आपल्या गावापासून पंढरपूर पर्यंत चालत येत असतात . त्यालाच *वारी , दिंडी* असे म्हटले जाते.
आळंदीहुन ज्ञानेश्वर माऊलीची तर देहूहून जगतगुरु संत तुकाराम महाराजांची तसेच सर्वच संतांच्या पालख्या या पंढरपूरला चालत येत असतात..
एकादशीच्या दिवशी नित्यनिनेमाने न चूकता पंढरपूरला जाणे याचाच अर्थ वारीस जाणे. *आणि जे लोक जातात ते वारकरी* हाच वारकरी धर्म आहे. भागवत धर्म आहे असे म्हटले आहे.
*आणि केवळ तो विश्वरुपी भगवंतच आपली माऊली आहे ही दृढ भावना मनात ठेवून पांडुरंगाला भेटणे , चंद्रभागा नदीत स्नान करणे हेच एक मोक्षमुक्तीचे महापुण्य आहे ही मनात श्रद्धा बाळगून वारी करणे हेच या भागवत , वैष्णवी संप्रदायाचे महत्व आहे.*

वारी करणाऱ्या भक्तांचे विठ्ठल भक्तीचे अनेक सत्यदृष्टांत , तसेच अनुभूती आणि प्रत्येकाचे वैयक्तिक स्वानुभव आहेत.
आषाढी एकादशीच्या या भागवत संप्रदायाच्या किंवा वैष्णवी संप्रदायाच्या या वारीच्या किंवा दिंडीच्या सोहळ्या मध्ये सर्वच देवदेवतांचे तेजाचे , कृपेचे साक्षात दृष्टांत आहेत . श्रद्धा , प्रचिती आहे. हे निर्विवाद .
*विठुमाऊलीच्या नामाचा भक्तीभावाने अखंड गजर करीत धावा करीत पायी चालत वारी करावी ही वारकऱ्यांची अढळ श्रद्धा असून तीच खरी मोक्षमुक्ती आहे ही आंतरिक भावना आहे*
म्हणून ही पंढरीची वारी आयुष्यात एकदा तरी करावी ही प्रत्येक भक्ताच्या मनातली इच्छा असते……..!!

*भुधरी हा स्वर्ग पंढरी इंदर राजा वारकरी*।।
*पंढरीचा पंढरी राणा नाचत येतो वाळवंटी*।।
असे एका कवीने म्हटले आहे.
*इती लेखन सीमा…….*
****************************
*वि. ग. सातपुते.*
*संस्थापक अध्यक्ष :-*
*महाकवी कालिदास प्रतिष्ठान.*
*पुणे ,मुंबई , ठाणे , मराठवाडा ( महाराष्ट्र )*
*📞(9766544908 )*

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*उपलब्ध कोर्सेस*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*

*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷‍♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*

*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*

*आमची प्रवेश केंद्रे -:*

*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639

*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198

*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383

*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071

*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98446/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा