*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम चित्रकाव्य अष्टाक्षरी रचना*
*रम्य सांज…*
आली हळू सांजवेळ
केशरले नभांगण
सोनरंगी किरणांचे
सागराला ते शिंपण….!!
खळखळ शांत आता
जणू लहरी गातात
नाद मधुर ऐकावा
सांध्यगीत श्रवणात….!!
पाय करूया मोकळे
मन चित्त शांतवता
मखमली भिजलेली
ओली वाळू सुखवता….!!
खेळ खेळती बालके
दंग किना-यावरती
सान थोर रमतात
मंद लाटांच्या सोबती…!!.
हवी हवी अशी सांज
मन मोहुनिया घेते
संथ लहरींचा नाद
दूरवर साद येते….!!
~~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार✍️
