माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर गुरुकुल मित्र मंडळाच्या वतीने आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
सावंतवाडी
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आमदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांचा वाढदिवस माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व गुरुकुल मित्र मंडळ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोकणाचे सुपुत्र मा. रवींद्रजी चव्हाण हे गोर-गरिबांच्या वेळेला धावणारे एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
आजच्या या वाढदिवसा प्रसंगी बबन साळगावकर यांनी चव्हाण साहेब मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणपती चरणी प्रार्थना केली आहे.
आज केसरी येथील दुर्गम भागामध्ये त्यांनी के एस आर सारखा प्रोजेक्ट उभा केला आहे त्याच्या माध्यमातून आज रोजी त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
भविष्यात हा प्रोजेक्ट नॅशनल लेवलला नक्कीच पोहोचेल असे मत बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देत त्यांना उदंड आयुष्य मिळो अशी त्यांनी उपरलकर पाटेकर चरणी प्रार्थना केली आहे.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर मा. नगरसेवक विलास जाधव, मनोज घाटकर संतोष तळवणेकर, दीपक सावंत, बंड्या तोरस्कर, अभय पंडित, दिवाकर भांडये,सचिन माडये गौरव जाधव, ओमकार जाधव, दर्शीद जाधव,रामचंद्र राऊळ, अशोक पेडणेकर, सुनील गावडे, उदय भराडी, सुनील साहिल, तुषार राऊळ,भरत सावंत, संतोष राऊळ,बाळा सावंत,प्रवीण लाखे व रवी जाधव उपस्थित होते.
