प्राधिकरण निगडी – मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी , ७:३० वाजता ‘श्री गणेश उत्सवा ‘ निमित्त प्राधिकरण विचार मंच, श्री चिंतामणी मंदिर ट्रस्ट, व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ निगडी,भजन महासंघ प्राधिकरण यांच्या वतीने ऋषी पंचमीच्या निमित्ताने, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाले.
श्री. चिंतामणी गणेश मंदिर , सेक्टर नं -24 प्राधिकरण निगडी येथे संपन्न झाले. सकाळी ७:३० वाजता भक्तीताई भाटे यांनी सर्वांच्या समोर बसून अथर्वशीर्ष पठण सुरुवात केली, त्यांच्याबरोबर उपस्थित सर्वांनी अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी अथर्वशीर्ष पठणचे २१ आवर्तने घेण्यात आले. अथर्वशीर्ष पठणनंतर फलश्रुती घेण्यात आली व गणपतीची सामुदायिक आरती करुन प्रसाद वाटप करण्यात आले. अथर्वशीर्ष पठण सामुदायिक कार्यक्रमाचे यंदा १४ वे वर्ष असून कार्यक्रमास, निगडी प्राधिकरण व परिसरातील महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व ज्ञानप्रबोधिनी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
तसेच परिसरातील अनेक गणेशभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती, कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन बाळा दानवले,उपाध्यक्ष मनसे, चंद्रशेखर जोशी अध्यक्ष प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, कार्यक्रमाचे, सूत्रसंचालन ज्योती कानेटकर सचिव भजन महासंघ यांनी केले,
या कार्यक्रमात महेश ढाकणे सचिव श्री चिंतामणी मंदिर ट्रस्ट, सुभाष जोशी मा. अध्यक्ष, जगन्नाथ वैद्य मा,अध्यक्ष समाधान सुसर ज्ञान प्रबोधिनीचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब साळुंखे मा,अध्यक्ष. अलका बेल्हेकर कार्याध्यक्ष , सतीश सगदेव अध्यक्ष स्वानंद संघ,कुंदा एरवंडे अध्यक्ष माऊली उद्यान, शामसुंदर परदेशी मा. अध्यक्ष, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांचा बाळा दानवले उपाध्यक्ष मनसे. चंद्रशेखर जोशी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
