You are currently viewing मोटार सायकलच्या धडकेत कणकवलीतील पादचाऱ्याचा मृत्यू…!

मोटार सायकलच्या धडकेत कणकवलीतील पादचाऱ्याचा मृत्यू…!

कणकवली

कणकवलीत सर्व्हिस रोडने चालत जात असताना येथील सारस्वत बँक नजिक पादचारी अनंत विठ्ठल मुळये (57, रा. कणकवली शिवाजीनगर) यांना मोटर सायकलची धडक बसल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असताना उपचारादरम्यान मध्यरात्री 12.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री 8 वा. च्या सुमारास घडला. याबाबतची फिर्याद सारस्वत बँकेच्या एटीएम मशीनचे सिक्युरिटी गार्ड गुरुदास पाताडे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. अनंत मुळये हे रविवारी रात्री 8 वा. शिवाजीनगर येथे रस्त्याने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या मोटरसायकलची त्यांना धडक बसली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच मोटरसायकलस्वार महेश दशरथ हुले (रा. कणकवली शिवाजीनगर) हा देखील किरकोळ जखमी झाला. अपघाताचा जोरदार आवाज येताच नजीक असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी अनंत मुळये यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना मध्यरात्री 12.30 वा. च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा