You are currently viewing आगामी सर्व निवडणुकीत १०० टक्के विजय हेच लक्ष – केंद्रीय मंत्री नारायण राणे

आगामी सर्व निवडणुकीत १०० टक्के विजय हेच लक्ष – केंद्रीय मंत्री नारायण राणे

भाजपा मालवण तालुका बुथ कार्यकर्ता मेळावा संपन्न

मालवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजपा देशाला महासत्ता बनवेल. देशाला सुरक्षित बनवेल. असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण कुंभारमाठ येथे बोलताना व्यक्त केला.

भाजपच्या नेतृत्वात भारताची गतिमान प्रगती होत आहे. भाजप हा जगातील मोठा पक्ष आहे. या पक्षाच्या सर्व उमेदवारांना आगामी सर्व निवडणुकीत बहुमताने विजय करणे हा धर्म प्रत्येकाने पाळावा. असे आवाहनही मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले.

भाजपा मालवण तालुका बुथ कार्यकर्ता मेळावा कुंभारमाठ येथील अथर्व सभागृहात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शन उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, तालुकाध्यक्ष पुजा करलकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, महिला पदाधिकारी सरोज परब, राजू परुळेकर, दीपक पाटकर यासह अन्य प्रमुख पदाधिकारी बुथ अध्यक्ष, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बुथ अध्यक्ष प्रभारी यांच्याकडून आढावा घेत मंत्री नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाला अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आणले. आता तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहे. प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. विविध प्रकल्प माध्यमातून गतिमान विकास सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचेही दरडोई उत्पन्न वाढत आहे. आणखी वाढविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. असेही मंत्री नारायण राणे म्हणाले.

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व सर्व टीमचे कौतुक केले. मालवण तालुक्यात सर्वांनी जोमाने काम केल्यास ९० टक्के मतदान भाजपला मिळेल. असा विश्वास राजन तेली यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार, राणे साहेबांच्या माध्यमातून, राज्य शासन माध्यमातून जिल्ह्यात मोठा विकासनिधी येत आहे. असेही राजन तेली यांनी सांगितले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती व मालवण नगरपालिका निवडणुकीत १०० टक्के यश मिळवल्यास वैभव नाईक आगामी विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याचे धाडस करणार नाहीत. असेही राजन तेली यांनी सांगितले. देश सक्षम होत आहे. महासत्ता दिशेने वाटचाल होत आहे. २०२४ सर्व निवडणुकीत भाजपचा विजय हेच लक्ष. असेही राजन तेली यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रास्ताविक केले. तर जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी बुथ सक्षम बाबत माहिती दिली. अतुल काळसेकर यांनी मार्गदर्शन केले. बुथ प्रमुख हा संघटनेचा महत्वाचा घटक आहे. असे सांगितले. रत्नागिरी व कुडाळ लोकसभा मतदारसंघ पहिल्यांदा भाजप कमळ निशाणीवर लढणार आहे. आणि जिंकणार आहे. देशात ४०० प्लस हे भाजपचे टार्गेट आहे. त्यात हा लोकसभा मतदारसंघ आहे. सर्वांनी जोमाने काम करा. ८० टक्के पेक्षा जास्त मतदान प्रत्येक बुथवर होईल. असा विश्वास अतुल काळसेकर यांनी व्यक्त केला. अतुल काळसेकर, राजन तेली, निलेश राणे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या कामाचे विशेष कौतुक केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा