You are currently viewing राजेंद्र राणे यांची माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड

राजेंद्र राणे यांची माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड

राजेंद्र राणे यांची माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड

कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई संचलित मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय, मांगवली येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

मांगवली :

कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई संचलित मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय, मांगवली येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेशी असलेले आपले ऋणानुबंध पुन्हा दृढ केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीधर राणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी श्री. राजेंद्र राणे यांची माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी शारदा कांबळे व महेश कदम, कोषाध्यक्षपदी भालचंद्र आयरे, सचिवपदी मुख्या. भोसले मॅडम, सहसचिवपदी मंगेश राणे यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी सुवर्णा संसारे, प्रकाश काळे, अनिकेत कोलते, उदय राणे, विजय गुरव, ऋषिकेश संसारे, सचिन मोरे, गणेश आयरे, प्रदीप रामाने, संजय नारकर, पालक प्रतिनिधी आकाराम नागप, माजी शिक्षक एस. डी. पाटील तसेच सहाय्यक महेंद्र मोरे यांची निवड झाली.
नवनिर्वाचित माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या शैक्षणिक, सामाजिक व भौतिक विकासासाठी योगदान देत शाळेच्या पुढील यशस्वी वाटचालीची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.
संस्थेचे संचालक तथा लिपिक श्री. शरद कांबळे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांसह शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर केला. सहाय्यक शिक्षक श्री. देवदास कदम सर यांनी PPT द्वारे संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. महेश संसारे यांनी शाळेसमोरील आगामी आव्हानांवर प्रकाश टाकून, त्यावर मात करण्यासाठी विद्यार्थी, पालक, देणगीदार व हितचिंतक यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गजानन राणे, सतीश जागुष्टे, महेश संसारे, सरचिटणीस अनंत राणे, संचालक साईश कोलते, मंगेश शेलार, स्कूल कमिटी उपचेअरमन दिलीप कोलते, माजी मुख्याध्यापक एस. डी. पाटील सर यांच्यासह बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या नवीन इमारतीची व परिसराची सामूहिक पाहणी केली. शाळेचा झालेला विकास, नवीन इमारत व सुसज्ज सुविधा पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
श्री. राजेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेला माजी विद्यार्थी संघ शाळेच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीधर राणे व माजी मुख्याध्यापक एस. डी. पाटील सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी महेंद्र मोरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याची सांगता झाली.
“ज्या शाळेने आपल्याला घडवले, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देणे हीच खरी कृतज्ञता!”

प्रतिक्रिया व्यक्त करा