मुंबई : महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे सहकुटुंब दर्शन घेतले.
यावेळी मंत्री नितेश राणे यांनी श्री गणरायाची मनोभावे आरती करून आशीर्वाद घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘वर्षा’ निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे दर्शन घेत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
“सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश लाभो, तसेच श्री गणरायाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनातील विघ्ने दूर होवोत,” अशी प्रार्थना मंत्री नितेश राणे यांनी श्री गणरायाच्या चरणी केली.
यावेळी सौ. नंदिता राणे तसेच कु. निमिष राणे यांचीही उपस्थिती होती.
