गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व घोटगे ग्रामपंचायत यांच्या वतीने मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये घोटगे गावचे उपसरपंच माननीय चैताली ढवळ मॅडम, सोनवडे गावचे सरपंच माननीय प्रतीक्षा घाडी मॅडम भरणी गावचे सरपंच माननीय अश्विनी मेस्त्री मॅडम,जांभवडे गावचे सरपंच माननीय अमित मडव सर,कुपवडे गावचे सरपंच माननीय दिलीप तवटे सर, भरणी गावचे पोलीस पाटील माननीय सरोज गाजरेकर मॅडम माजी सरपंच घोडगे अनुसया ढवळ मॅडम चेतन ढवळ, घोटे सर
साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर,कर्मचारी प्रणाली दळवी मॅडम,विशाखा कासले मॅडम, हर्षद खरात आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणरायाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर यांनी घेण्यात आलेला दिव्यांग मेळावा का घेतला आहे? त्याचे महत्त्व पटवून दिले व थोडक्यात माहिती दिली.दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला विभाग वार मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व विविध योजनांचे फायदे सांगितले. तसेच घोटगे सरपंच ढवळ मॅडम यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.व शुभेच्छा दिल्या. तसेच जांभवडे सरपंच अमित मडव सर यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व या मेळाव्याचा आपण फायदा करून घ्यावा असे सांगितले.व आपण कधीही आम्हाला हाक द्या आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असे सांगितले.
या मेळाव्यामध्ये पन्नासहून जास्त दिव्यांग उपस्थित होते. उपस्थित दिव्यांग बांधवांना साईकृपा संस्थेच्या वतीने भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच घोडगे सरपंच ढवळ मॅडम यांनी सर्व दिव्यांग बांधवांची अल्पोपहाराची व्यवस्था केली.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच समाजामध्ये आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घोटे सर यांनी केले.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी उपस्थित यांचा आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
