You are currently viewing का कुणास ठाऊक ?

का कुणास ठाऊक ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित भावस्पर्शी काव्यरचना*

 

*का कुणास ठाऊक ?*

संदर्भ:नेपाळ दुर्घटना

 

साश्रु नयने रुदीता, हुंदकाही गळी अडकला

प्रेमे आठवणीने,रुमालही बघ चिंब भिजला

 

उडाले छप्पर तयांचे, जरी ते गळत होते

झाकले होते लक्तर त्यानेच, परि आज गर्भगळीत होते

 

निरोप देण्या त्यांना,जाऊ न शके कुंपणाशी

कैसी ही लीला बरसली, दैवा तू मम जीवनाशी

 

होतो हताश तेंव्हा, दुरुनीच हताश होत आहे

नव्हता कधीच भरला अर्धा, तो पेग अर्धा भरतोय ह्या कराने

 

सोडून तोच गेला, येतो तरी म्हणीला होता का तो?

संक्षेप जीवनी ह्या, आक्षेप हाच आहे

 

होते ते रुंद खांदे, धाय मोकळुनी रडाया

द्यावया खांदा तयांना, हतबद्ध क्षुब्ध मी आहे

 

तू आहेस ह्या जगी , जाणतो तूच अर्वाचीन आहे

की तू ही हे भगवन !,आज टाळीत मजला आहे ?

 

 

—राजा जोशी

9823687519

प्रतिक्रिया व्यक्त करा