आर.पी.डी.हायस्कूल सावंतवाडीच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.एस.एस.कशाळीकर यांचा नगरसेविका सौ.ज्योती जाधव यांनी केला सत्कार
सावंतवाडी
शिक्षणक्षेत्रात प्रदिर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावून नुकत्याच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या आर.पी.डी.हायस्कूल व ज्युनि.कॉलेज ,सावंतवाडीच्या मुख्याध्यापिका -सौ.एस.एस.कशाळीकर यांचा कसई दोडामार्ग च्या विद्यमान नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती -सौ.ज्योती रमाकांत जाधव यांनी सत्कार केला.
सौ.एस.एस.कशाळीकर यांनी आपल्या सेवा काळाची सुरूवात दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज,दोडामार्ग येथे केली.प्रदिर्घकाळ शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत तसेच संस्थेच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले.त्यानंतर त्यांनी आर.पी.डी.हायस्कुल व ज्युनि.कॉलेज ,सावंतवाडी येथे मुख्याध्यापिका म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली.
सौ.कशाळीकर या उत्कृष्ट निवेदिका,साहित्यिक दृष्टीकोन असलेल्या प्रभावी वक्त्या तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून परिचित आहेत.आपल्या प्रदिर्घ शैक्षणिक सेवेत त्यांनी केवळ अध्यापनाची जबाबदारी पार पाडली नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासाला सातत्याने प्रोत्साहन दिले.आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीने ,साहित्यिक जाणिवेने आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याने त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
31ऑगस्ट 2026 रोजी त्या नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाल्या.त्यांच्य प्रदिर्घ आणि उल्लेखनीय शैक्षणिक सेवेबद्दल गौरव व्यक्त करण्यासाठी तसेच सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी सौ.ज्योती जाधव यांनी आर.पी.डी.हायस्कुलमध्ये त्यांची सदिच्छा भेट घेतली व शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज,दोडामार्ग चे सेवानिवृत्त शिक्षक -रमाकांत जाधव,माजी विद्यार्थी -इंजि.राजरत्न जाधव,ॲड.राहूल जाधव उपस्थित होते.त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य,आनंद व यशाच्या शुभेच्छा दिल्या.
