You are currently viewing मालवणात व्यापाऱ्याची १० लाखांची फसवणूक

मालवणात व्यापाऱ्याची १० लाखांची फसवणूक

विदेशी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त परताव्याचा आमिषातून प्रकार

मालवण

मालवण शहरातील एका व्यापाऱ्याची सुमारे १० लाख रक्कमेची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कलमान्वये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विदेशी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास डॉलर मध्ये जास्त परतावा मिळेल. भारतीय चलनात पैसे मिळतील. याबाबत अँप डाउनलोड करा. असे सांगून काही रक्कम परतावा स्वरूपात संबंधित व्यापाऱ्यास दिली. त्यावर विश्वास ठेवून गेल्या महिन्याभरात सुमारे १० लाख रक्कम संबंधित व्यापारी याने अँप डाउनलोड करून रक्कम भरणा केली. मात्र डॉलर सवरूपात अथवा भारतीय अश्या कोणत्याही स्वरूपात परतावा मिळाला नाही. ज्या व्यक्तीने अँप डाउनलोड करण्यास सांगितले त्याच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 8 =