You are currently viewing श्रावणरंग

श्रावणरंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रावणरंग* (वृत्त~केशवकरणी)

 

श्रावणातला निसर्ग सुंदर मोह मनासी पडे

विभवता सृष्टीची ही घडे

 

क्षणात येती सरसर धारा ऊन कोवळे पडे

नाचती थुइ थुइ मयूर गडे

 

कमान गगनी इंद्रधनूची सप्तरंग आगळे

भूवरी चित्र नवे वेग

 

डोंगरमाथ्यावरती हिरवी गर्द वृक्षवल्लरी

धरा बघ हरित शाल पांघरी

 

गिरीकंदरामधुनी येतो प्रपात फेसाळुनी

जणू ते बालक भासे गुणी

 

दरवळ सुटला कोवळा मका शेक निखार्‍यावरी

मोद हा किती निराळा तरी

 

पहाट समयी अंगण सजले प्राजक्ताचे सडे

मंदिरी शहनाई चौघडे

 

अवतरलाहे स्वर्ग देखणा इथेच पृथ्वीवरी

भिजूया घेता श्रावणसरी

 

अरुणा मुल्हेरकर

प्रतिक्रिया व्यक्त करा