मयूरपंख २०२६ सांस्कृतिक महोत्सवात मांडकी-पावलण कृषी महाविद्यालयाचे घवघवीत यश
चिपळूण, मांडकी-पालवण
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली द्वारे आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२६’ मध्ये मांडकी-पावलण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांत चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य व ललित कला विभागात आपली छाप सोडली.
कृषी महाविद्यालय, दापोली येथे १ ते ३ सप्टेंबर २०२६ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या संघाने ‘भारतीय लोकनृत्य’ प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. याशिवाय ललित कला प्रकारातही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवत ऑन द स्पॉट पेंटिंग, कु. पियुष सलोखे (प्रथम क्रमांक), कोलॅज मेकिंग कु. श्रावणी कदम (द्वितीय क्रमांक), क्ले मॉडेलिंग कु. जतीन पाटणकर (तृतीय क्रमांक), भारतीय लोकनृत्य प्रकारात कु. श्रावणी भिसे, कु. श्रावणी कदम, कु. प्राजक्ता कुंभार, कु. स्वरांजली रामशे, कु. सरिता गिरी, कु. सावली लाड, कु. श्रद्धा लांबे, कु. समीक्षा पाटील आणि कु. श्रावणी सपकाळ या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे व उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
