नवी मुंबई :
नवी मुंबईच्या सुपरिचित कवयित्री/ लेखिका शैलजा करोडे यांचा कवितासंग्रह ” हुंकार काळजाचा ” ( 100 कविता ) कर्नाटक विद्यापीठ धारवाड यांनी TYBA सत्र पाच साठी शैक्षणिक वर्ष 2026/27 पासून पाठ्यपुस्तक म्हणून समाविष्ट केला आहे. नुकतेच विद्यापीठाकडून त्यांना अभिनंदनाचे पत्र आले आहे.
तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एम ए साठी कथा / कादंबरी अभ्यासक्रमाअंतर्गत त्यांचा ” माणुसकी कथासंग्रह ( 20 कथा ) 2026/27 या वर्षापासुन अतिरिक्त वाचनासाठी लावण्यात आला आहे.
कवयित्री शैलजा करोडे यांची कविता ” खिडकीतील आभाळ ” क. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोव्हेंबर 2024 पासुन FYBA साठी खानदेश काव्यप्रबोध मध्ये समाविष्ट आहे.
शैलजा करोडे यांचे या यशासाठी समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
—————————————————
