You are currently viewing अवैध दारूवर जिल्हा वाहतूक शाखेची धडक कारवाई

अवैध दारूवर जिल्हा वाहतूक शाखेची धडक कारवाई

 २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी

सातोळी बावळट इथं नाकाबंदी दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई केली. गोवा बनावटीच्या दारूच्या ५०० बॉक्सची वाहतूक या टेम्पोतून ह़ोत होती‌. समोर बॅरल लावत अगदी शिताफीने दारू वाहतूक करण्याचा प्रयत्न दारू माफियांकडून करण्यात आला. मात्र, जिल्हा वाहतूक पोलीसांनी हा डाव उधळून लावत अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई केली आहे. इंदोर येथील दोघांवर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ लाख ४ हजार ८०० चा मुद्देमाल जप्त केला. रात्री पावणेबाराच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आला. गोव्यातून नांदेड इथ ही दारू वाहतूक होत होती. पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री. वटकर, पोलिस अजित घाडी, वाहतूक पोलीस विलास नर, प्रशांत धुमाळे, मयुर सावंत, श्री. संकपाळ यांनी ही धडक कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − three =