You are currently viewing भांडुपच्या कोकणनगर येथे तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन!

भांडुपच्या कोकणनगर येथे तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन!

सगळ्यांच्या सहकार्यातून, योगदानामुळे – जेष्ठ सल्लागार पांडुरंग पराडकर

मुंबई / (प्रतिनिधी) : आज तांबळडेग स्थितीत मुंबईकरांच्या मनात आनंदी वातावरण पाहून तुमच्या इतकाच माझ्याही मनात आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या असून खरंतर यामागे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि योगदान आहे म्हणून आजचा सोहळा साजरा करण्याचं भाग्य मला लाभलं असे तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री. पांडुरंग वासुदेव पराडकर यांनी भांडुप कोकणनगर येथील संस्थेच्या नुतन वास्तु कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गौरव उद्गार व्यक्त केले. प्रारंभी विठ्ठलभक्त सौ.शुभदा हरिश्चंद्र कोचरेकर या दांपत्याच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. श्री. पांडुरंग वासुदेव पराडकर पुढे म्हणाले की, हा सोहळा साजरा होत असताना कै. विलास वसंत कुबल यांचे परिश्रम चिकाटी विसरू चालणार नाही. त्यांनीही तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेसाठी कार्य केले. गावचे मुक्तद्वार सागर वाचनालय व तांबळडेग शिक्षणोत्कर्षक या संलग्न संस्था म्हणून कार्यरत आहेत. या दुहेरी संस्था म्हणजे सरस्वतीचे मंदिरे आहेत. वाचकांची संख्या वाढली पाहिजे प्रथम क्रमांकाचे ग्रंथ संग्रहालय म्हणून पाहिले जाते असे नमूद केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुबोध रामचंद्र येरम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष प्रमोद कांदळगावकर, जेष्ठ सल्लागार गणपत सादये, चंद्रकांत कोळंबकर, संस्थेचे माजी चिटणीस हरिश्चंद्र कोचरेकर,जेष्ठ नागरिक दत्तात्रय नावगे, बबन केरकर, कायदेशीर सल्लागार अँड राज कुबल, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सनये, दत्तात्रय धावडे आदींना जेष्ठ सल्लागार पांडुरंग वासुदेव पराडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चिटणीस दिगंबर धावडे, उपचिटणीस अजित सनये, खजिनदार सचिन जोशी, राजाराम बांदकर, लिलाधर कोळंबकर, सदस्या सौ. रिया राज कुबल आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा