You are currently viewing दशावतार नाट्यमहोत्सव हा लोकोपयोगी स्तुत्य उपक्रम – निलेश राणे

दशावतार नाट्यमहोत्सव हा लोकोपयोगी स्तुत्य उपक्रम – निलेश राणे

रेडी येथे नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महोत्सवाला उत्सुर्त प्रतिसाद…

वेंगुर्ले

रेडी गावात या दशावतारी नाट्य महोत्सवा सारखे वेगवेगळे विविधांगी कार्यक्रम प्रितेश राऊळ राबवित असतात, याचा मला अभिमान आहे. राजकारणा पूर्ते राजकारण आणि अन्य वेळी समाजकारण, अशी शिकवण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आहे. आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रेडी मध्ये हा लोकोपयोगी दशावतारी महोत्सव होत आहे. हा उपक्रमच स्तुत्य असल्याचे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी रेडी येथे बोलताना केले.

केंद्रीय मंत्री श्री. राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितेश राऊळ मित्र मंडळ पुरस्कृत आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप, रेडी यांच्या तर्फे रेडी येथे सहा दिवसीय भव्य दशावतार नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रेडी ग्रामपंचायत पटांगण येथे

या दशावतारी नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी रात्री जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते झाले. तर काल रात्री माजी खासदार निलेश राणे यांनी या महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या महोत्सवाला रेडी वाचकांचा मिळत असलेला पाठिंबा पाहून निलेश राणे यांनी समाधान व्यक्त केले. भाषणादरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा ही विचार न करता निलेश राणे यांनी आयोजकांचे कौतुक करून या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. तसेच रेडी गावाच्या विकासासाठी कधी मदत लागली तर हक्काने आपल्याला हाक मारा. हाकेला नक्की प्रतिसाद देईन असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाला व्यासपीठावर रेडी जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रितेश राऊळ, सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब, युवा नेते विशाल परब, रेडी सरपंच रामसिंग राणे, ज्येष्ठ दशावतारी जयसिंग राणे तसेच माझी पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, परबवाडा सरपंच पप्पू परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल तसेच बाबली वायंगणकर, दादा राणे, ज्ञानेश्वर तांडेल, प्रसाद पाटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रेडी गावाच्या वतीने निलेश राणे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच गुणवंतांचा सत्कार निलेश राणे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान प्रास्ताविक प्रितेश राऊळ यांनी तर आभार वसंत तांडेल यांनी मानले

गुरुवार ७ ते १२ एप्रिल या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात पहिल्या दिवशी ७ एप्रिल ला “विघ्न निवारि गजमुख हे नाटक काल ८ एप्रिल रोजी “वज्रशल्क अर्थात खवले मांजर”, हे नाटक सादर झाले. दरम्यान या नाट्यमहोत्सवा मध्ये रेडी वासिय मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा