You are currently viewing मसुरे येथील खुल्या समूह नृत्य स्पर्धेत आरडीएक्स ग्रुप सावंतवाडी आणि एकेरी नृत्य स्पर्धेत सोहम जांभुरे प्रथम

मसुरे येथील खुल्या समूह नृत्य स्पर्धेत आरडीएक्स ग्रुप सावंतवाडी आणि एकेरी नृत्य स्पर्धेत सोहम जांभुरे प्रथम

मसुरे :

 

पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यांच्यावतीने आयोजित खुल्या समूह नृत्य स्पर्धेत आर डी एक्स ग्रुप सावंतवाडी प्रथम क्रमांक आणि एकेरी नृत्य स्पर्धेत सोहम जांभुरे सावंतवाडी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.समूहनृत्य स्पर्धेत अष्टपैलू युवा कलानिकेतन मालवण द्वितीय, एस के ग्रुप कणकवली तृतीय क्रमांक प्राप्त केला. समूह नृत्य स्पर्धेतील प्रथम एक ते तीन विजेत्यांना रोख रुपये सात हजार, पाच हजार, तीन हजार आणि प्रत्येकी स्मृतिचिन्ह बक्षीस देण्यात आले.

खुल्या गटातील एकेरी नृत्य स्पर्धेत पूर्वा मेस्त्री द्वितीय, प्रियस पवार तृतीय, सायली राऊळ चतुर्थ, आणि उत्तेजनार्थ नंदिनी बिले, दुर्वा पावस्कर, क्रांती पालव, विवेक सावंत, आरव आहिर या सर्वांना रोख रुपये आणि प्रत्येकी स्मृतिचिन्ह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. समुह नृत्य स्पर्धेत आठ संघ आणि एकेरी नृत्य स्पर्धेत २५ स्पर्धक सहभागी झाले होते.

दोन्ही स्पर्धांचे परीक्षण प्रसिद्ध नृत्य कोरिओग्राफर तथा आदर्श शिक्षक आनंद तांबे, नृत्य कोरिओग्राफर निलेश नाईक, प्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्य कोरिओग्राफर प्रियांका करंबळेकर आणि अभिनेते, डान्सर सुदिन तांबे यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन मर्डे सरपंच संदीप हडकर यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी पावनाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर विश्वास साठे, या संस्थेच्या अध्यक्षा सौ अलका साठे, सुहास पेडणेकर,बिळवस सरपंच सौ. मानसी पालव, छोटू ठाकूर, बांदिवडे माजी सरपंच सतीश बांदिवडेकर, पांडुरंग ठाकूर, पंढरीनाथ मसुरकर, उपाध्यक्ष सौ पूजा ठाकूर, सचिव तन्वी हिंदळेकर, तुळशीदास चव्हाण, बाबू आंगणे, दत्तप्रसाद पेडणेकर, संस्था सदस्य आबीदाबी चिस्ती, सीमा घाडीगावकर, सिद्धी मसूरकर, मानसी पवार, मयुरी पेडणेकर, प्रियंका बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

मसुरे सारख्या ग्रामीण भागात अशा पद्धतीच्या मोठ्या नृत्य स्पर्धा भरवून येथील स्पर्धकांना, गुणवंताना पुढे आणण्याचा या दूध उत्पादक संस्थेचा मानस आहे. अशा स्पर्धा मधूनच पुढे प्रसिद्ध डांसर, प्रसिद्ध अभिनेते घडावेत असे प्रतिपादन बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना या संस्थेचे सर्वेसर्वा डॉक्टर विश्वास साठे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या सभासदांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी नारायण परब, अभी दुखंडे, अभी घाडीगावकर, गौरव गिरकर, तात्या बागवे, हेमंत बागवे, सुरज परब, संतोष राणे, विकास ठाकूर, उमेश बागवे, मारुती सावंत, महंमद खान, सोहेल फकीर, शशांक ठाकूर, स्वप्निल ठाकूर यांनी प्रयत्न केले. दोन्ही स्पर्धा नियोजन पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे आणि डान्स स्पर्धेचे सूत्रसंचालन गजानन उर्फ बाबू आंगणे आणि आभार पांडुरंग ठाकूर यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा