सावंतवाडीत व्यापाऱ्यांसाठी अन्न व पाणी परीक्षणाची विशेष सुविधा
व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या पुढाकाराने २९ व ३० ऑगस्टला आयोजन
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने अन्नसुरक्षा अंतर्गत पाणी परीक्षण व अन्नपदार्थ परीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सावंतवाडी नगरपालिका इंदिरा गांधी संकुलातील पत्रकार कक्षाशेजारील खोलीत शनिवार, २९ ऑगस्ट आणि रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
तालुक्यातील ज्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायातील पाणी अथवा अन्नपदार्थांचे परीक्षण करून घ्यायचे आहे, त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
नमुने आणताना या सूचनांचे पालन करा
पाणी बाटली व कंटेनर आवश्यक असणाऱ्या व्यावसायिकांनी शक्य असल्यास आदल्या दिवशी भारत माता हॉटेल येथून ते घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अन्न व पाण्याचे नमुने आणताना पुढील बाबींची काळजी घ्यावी—
पाण्याची बाटली पूर्ण एक लिटर भरून आणावी.
डब्यात ग्रेव्ही भरताना ती थंड करून भरावी.
अन्नसुरक्षा परवान्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी.
अन्नसुरक्षा परवान्याच्या मागील बाजूस आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक लिहावा.
GST क्रमांक असल्यास तो नमूद करावा.
डब्यातील अन्नपदार्थाचे नाव स्पष्टपणे लिहावे.
पाण्याचा नमुना असल्यास बाटलीवर ‘पाणी नमुना’ असे लिहावे.
व्यावसायिकांनी परीक्षण करून घेण्याचे आवाहन
अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे परीक्षण महत्त्वाचे असून, तालुक्यातील सर्व संबंधित व्यावसायिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
