You are currently viewing कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा – राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा – राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

सावंतवाडी पोलिसांकडे केली मागणी…

सावंतवाडी

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अवमानकारक टीका करणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पोलिसांकडे करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार सौ. दर्शना बाबर देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सौ सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, तालुका चिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, मनोज वाघमोरे आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सत्तार यांनी सुळेंवर केलेली टीका निंदनीय आहे. एका जबाबदार मंत्र्याला अशी भाषा शोभत नाही. त्यांनी केलेल्या टीके नंतर राष्ट्रवादीसह महिला वर्गात असंतोष पसरला आहे. त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे होत आहे. तरी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा “त्या” वक्तव्याबाबत सत्तार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी राष्ट्रवादीने केले आहे. त्यासंदर्भातील निवेदन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा