दोडामार्ग पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा उद्या
स्वामी विवेकानंद सभागृहात सकाळी ११ वाजता सभेचे आयोजन
दोडामार्ग :
पंचायत समिती दोडामार्गची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत पंचायत समितीच्या नमुना ‘अ’ जोडपत्रात नमूद करण्यात आलेल्या विविध विषयांवर चर्चा करून कामकाज पार पाडण्यात येणार आहे. सभेस संबंधित पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मा. सभापती महोदय यांच्या मान्यतेने पंचायत समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी अजिंक्य दत्तात्रय सावंत यांनी सभेची सूचना जारी केली आहे.
