You are currently viewing अवैध दारू वाहतूक प्रकरणी राजस्थान मधील दोघांची जामिनावर मुक्तता

अवैध दारू वाहतूक प्रकरणी राजस्थान मधील दोघांची जामिनावर मुक्तता

 

कुडाळ

अवैध दारू वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या राजस्थान मधील दोघांची आज न्यायालयाने पंचवीस हजाराच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. कृष्णकुमार चतराराम राजपुरोहित व सत्तार मिठा खानवळ , अशी त्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई २९ ऑक्टोबरला मुंबई-गोवा महामार्गावर झराप येथे करण्यात आली होती. यावेळी त्यांच्याकडून तब्बल ५२ लाख ५६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली होती. तर आज त्यांची जामीनावर मुक्तता झाली आहे. आरोपी तर्फे अँड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =