*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आशेचा किरण*
पसरलेल्या काळोखात
एक आशेचा किरण
उजळ तुझी बुद्धीमत्ता
घडावे ना विस्मरण…
तू ज्योती तू ज्वाला
तू ठिणगी पेटती मशाल
उघड आतली कवाडे
बघ बाहेर जग विशाल…
अंधारात बुडू नकोस
शोध घे किरणांचा
तुझ्याजवळ आहे तुझा
आरसा लख्ख जीवनाचा….
पंख पसरून आशेचे
झेप घे उंच आकाशात
घे कवेत मुक्त चांदणं
अडचणींवर करून मात….
साचत जातं मळभ कधी
येतात काळे मेघ दाटून
जिद्द चिकाटी सोडू नकोस
प्रकाश येतोच पुन्हा परतून….!!
००००००००००००००००००
*अरुणा दुद्दलवार*✍️🌹
