You are currently viewing जि. प अध्यक्ष प्रमोद कामत यांचा वेंगुर्ला पंचायत समितीतर्फे सत्कार
Oplus_16908288

जि. प अध्यक्ष प्रमोद कामत यांचा वेंगुर्ला पंचायत समितीतर्फे सत्कार

सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

 

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी मंगळवारी वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयास भेट दिली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती दालनात वेंगुर्ला पंचायत समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

पंचायत समितीचे सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांच्या हस्ते प्रमोद कामत यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तुळसचे रामचंद्र परब, वाफोली उपसरपंच विनेश गवस, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, मातोंड ग्रा. पं. सदस्य व पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपेश परब, आडेलीचे विष्णू कोंडस्कर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा