You are currently viewing रानबांबुळी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाचे निमित्ताने सामाजिक उपक्रम

रानबांबुळी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाचे निमित्ताने सामाजिक उपक्रम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. रानबांबुळी येथेही स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाचे निमित्ताने ज्येष्ठ नागरिक सत्कार, विद्यार्थ्यांना मोबाईल चे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन पर कार्यक्रम तसेच राधिका सावंत यांनी किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांना शेती विषयी कृषी सहाय्यक श्रीम. प्रिया खरावडे, कृषी पर्यवेक्षक श्री. परब, कृषी मित्र सचिन बांबुलकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच श्री वसंत रमेश बांबुळकर, उपसरपंच श्री सतीश अमृत परब, सी एच ओ उपकेंद्र ओरोस राधिका सावंत, ग्रामसेवक एस ई लुडबे, ग्रामपंचायत कर्मचारी, अनंन्या म्हसकर, नूतन बोभाटे, शाळेतील मुख्याध्यापक. श्री दिपक पाताडे, श्रीम. मसुरेकर, श्री नाईक, श्री खोत व शाळेतील मुले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा