*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*महान क्रांतिकारी*
हो आज स्वातंत्र्यदिनी
मी भगतसिंग बोलतोय……
मी ह्या मातृभूमीतून गेलो नाहीय…!
मी मुळी संपलोच नाहीय
संपलय ते माझे शरीर
फासावर लटकलेले……!
पण, माझा प्राण, मन…
माझी तत्व, स्वतंत्र भारतभूमीच्या
मातीतल्या कणाकणात पार रुतलेली आहेत…
लाहोरच्या अंधाऱ्या कोठडीतून
अजूनही नारा ऐकू येतोय…
इन्कलाब झिंदाबाद….!!
मला फाशी दिली इंग्रजांनी
त्या शरीराला , मला नाही
तेवीस वर्षाचे शरीर फासावर लटकलेले…
माझ्यातली देशभक्ती नाही ती अजून जीवंत आहे…
माझे तरुण रक्त जी देशप्रेमाने
सळसळलेले…. ते आहे मायभूमीत
मातीत खोलवर प्रज्वलित आहे
देशभक्तीची धगधगती ज्वाला….!
म्हणूनच तर आपले वीर सैनिक
सीमारेषेवर अहोरात्र तैनात आहेत
प्राणांचे बलिदान देत आहेत……!
माझ्या मते अजूनही भारतमाता
पारतंत्र्याच्या शृंखलेने जखडलेली आहे…!!
ही शृंखला.. बेडी आहे जातपातीची , भेदभावाची…!
स्त्री पुरुष असमानता अजूनही दिसत आहे.!
डॉ बाबासाहेबांचे संविधान नुसते
ग्रंथापुरते मर्यादित राहिली आहे!
ते प्रत्येक भारतीयाच्या आचार, विचारमध्ये सामावले पाहिजे
तरच प्रत्येक नागरिकाचा हक्क स्वतंत्र असेल..!
स्वतंत्र म्हणजे प्रत्येकाचे विचार नि आचरण कृती मुक्त व्यक्त हवेत…!!
जेव्हा सर्वधर्म समभाव भारतभूमीच्या कानाकोपऱ्यात सर्वार्थाने रुजेल तेव्हाच माझा भारत देश स्वतंत्र आणि महान असेल…….!!
*मानसी जामसंडेकर, गोवा*
