You are currently viewing आकाशाच्या तारकांना

आकाशाच्या तारकांना

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ रेखा तांबे लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*दिवाळीच्या शुभेच्छा*

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

आकाशाच्या तारकांना
आमंत्रण दिवाळीचे
धरेवर तेवतात
लक्ष दिवे पणतीचे…..

सुरूवात हिवाळ्याची
ऋतू आल्हाददायक
थंडी गुलाबी पसरे
वाटे उत्साहवर्धक……

दिवाळीच्या सणासाठी
तोरा चार दिवसांचा
वस्त्रे नवीन सोबत
थाट न्यारा फराळाचा….

आकाशकंदील सजे
शोभे रांगोळी, तोरण
प्रज्वलित दीपमाळा
आनंदित सर्व जन……

रोषणाई ही दिव्यांची
असे प्रत्येकाच्या घरी
ज्यांची दुःखाची दिवाळी
प्रकाशाने व्हावी बरी…..

सर्व नाती महत्वाची
दिवाळीच्या सणासाठी
आता देऊ या शुभेच्छा
मैत्रीसाठी, नात्यांसाठी…..

सौ. रेखा तांबे.
वडोदरा.

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =