You are currently viewing *”आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मारक क्रांतीतीर्थ व्हावे..”

*”आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मारक क्रांतीतीर्थ व्हावे..”

*”आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मारक क्रांतीतीर्थ व्हावे..”*

*– संदीप तापकीर*

पिंपरी –
पिंपरी – चिंचवड शहरातील शब्दधन काव्यमंचाच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी पुण्यातील मामलेदार कचेरी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करून जाज्वल देशभक्तीचे दर्शन घडविणारे कवी संमेलन घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अभ्यासक शिवाजीराव शिर्के होते. प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास अभ्यासक, विश्वकर्मा पब्लिकेशनचे संपादक संदीप तापकीर होते, तर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकाचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, सचिव सुनील जाधव,राजे उमाजी नाईक यांचे सातवे वंशज श्रीकांत खोमणे , इतिहास अभ्यासक मोहन शेटे, उत्तम धनवटे, वेदांतश्री: प्रकाशनचे संपादक सुनील उंब्रजकर हरिभक्त परायण अशोक महाराज गोरे, दत्ता कांगळे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मामलेदार कचेरीच्या प्रवेशद्वारापासून क्रांतिवीर “राजे उमाजी नाईक अमर रहे” अशा घोषणा देत स्मारकाच्या प्रांगणातील प्रत्येक पावन वास्तूला नमन करून क्रांतीचा जयजयकार करणारी मिरवणूक साहित्यिकांनी काढली.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी या पवित्र वास्तुत शंखनाद केला आणि त्यांनी आपल्या प्रास्ताविकात शब्दधन काव्यमंचाच्या उपक्रमांचा परिचय करून दिला.
स्मारकातील ऐतिहासिक कवी संमेलनात शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी
” हे वंदन आमुचे क्रांतिकारका..” ही कविता सादर केली.

यावेळी इतिहास अभ्यासक संदीप तापकीर म्हणाले..
” ब्रिटिश जुलूमशाही विरुद्ध आवाज उठवणारे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक होते. त्यांच्या बलिदानाने पावन झालेले हे स्मारक एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. याचे जतन व्हावे! या स्मारकाचे क्रांती तीर्थ व्हावे. ”

रानकवी जगदीश वनशिव,सीताराम नरके, संजय गमे, राधाबाई वाघमारे, शामराव सरकाळे, कांचन नेवे, बाळकृष्ण अमृतकर, ज्योती देशमुख, सुरेखा हिरवे, रेखा दुसाने, सुनीता घोडके, अण्णा उमरगे, मोहम्मद शरीफ मुलाणी, बाळासाहेब साळुंखे, प्रकाश रसाळ, नंदकिशोर गावडे , अरुण घोडके या कवींनी देशभक्तीपर काव्यरचना सादर केल्या.
समीक्षक, लेखक नारायण कुंभार यांनी कवींनी सादर केलेल्या कवितांचा सुरेख आढावा घेतला.
स्मारकाचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण याप्रसंगी म्हणाले..
“देशासाठी लढलेल्या क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे रक्षण व्हावे यास्तव स्मारक समिती काम करत आहे.”
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना इतिहास अभ्यासक शिवाजीराव शिर्के म्हणाले..
“ऐतिहासिक वास्तूंचे जतन झाले पाहिजे. येणाऱ्या नव्या युवा पिढीसाठी हे स्मारक स्फूर्तीस्थान असेल.!”
या ऐतिहासिक कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी तानाजी एकोंडे यांनी केले. तर आभार मुरलीधर दळवी यांनी मानले.
शंकर नाणेकर, पांडुरंग सुतार आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी संयोजन केले.
सामूहिक वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

*वृत्तांकन – सुरेश कंक*, पिंपरी चिंचवड, पुणे
७५२२९०२७२७

प्रतिक्रिया व्यक्त करा