प्राधिकरण –
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मा.ना.श्री.अण्णा दादू बनसोडे उपाध्यक्ष: महाराष्ट्र विधानसभा आमदार: पिंपरी विधानसभा यांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण व फीत कापून संपन्न झाला.श्री गणेश व कलश पूजन आणि सत्यनारायण पूजेनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
मा. अण्णा बनसोडे यांचा सत्कार प्रा.ज्ये.नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर जोशी यांनी पुणेरी पगडी,शाल,श्रीफळ व गुलाबपुष्पाचे रोपटे देऊन केला.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात, संघाच्या दैदिप्यमान कार्याचा उल्लेख करताना , या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी सक्रीय सहाय्य केले याबद्दल, मा. आमदारांचे आभार मानले.
याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर,नगरसेविका शैलजाताई मोरे,नगरसेवक श्री.अमित गावडे,सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश शिंदे,सौ.प्रितम शिंदे,श्री.बाळा दानवले,श्री.बाळा शिंदे,श्री,समीर जावळकर, श्री.अतुल इनामदार,श्री.अरुण थोरात,सौ.सरिता साने,श्री.धनंजय काळभोर,श्री.राजेंद्र बाबर, श्री.अमोल निकम,लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ.शिल्पी कुमार,श्री.सचिन बनसोडे, श्री.अरुण थोरात, महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ यांचा सत्कार शाल,श्रीफळ व गुलाबपुष्पाचे रोपटे देऊन केला.
इमारत बांधकाम पुनर्विकास समितीतील श्री.सुभाष जोशी,श्री.आर.एस.कुमार,श्री. श्यामसुंदर परदेशी, श्री.सूर्यकांत मुथियान,श्री.शरद यन्नुवार. श्री.भगवान महाजन व श्री.बाळासाहेब साळुंखे या सर्वांचा सत्कार शाल,श्रीफळ, व गुलाबपुष्पाचे रोपटे देऊन करण्यात आला.
प्रा.जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री.गुणवंत चिखलीकर,सौ भारती फरांदे, श्री.डॉ.दिगंबर इंगोले, श्री.जगन्नाथ वैद्य,सौ.डॉ.ज्योती इंगोले, श्री.दलीचंद शिंगवी,श्री मंगेश वर्टीकर,सौ. अर्चना वर्टीकर,श्री.आनंद मुळूक या सर्वांचा श्रीफळ व गुलाबपुष्पाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बांधकाम कंत्राटदार श्री.रणजीत झेंडे,सहकारी श्री.अमोल देवकर,आर्किटेक्ट श्री.मिलिंद किर्ती ,अभियंता श्री.किशोर बोटे ,पत्रकार श्री.नंदू साळुंखे,श्री.प्रमोद पवार या सर्वांचा सत्कार करण्यात आला.सौ वृषाली व विजय गुर्जर व दारासमोर अतिशय सुंदर रांगोळी काढलेले श्री.विश्वास फडणीस यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या सौ.ज्योती कानेटकर यांचा सत्कार करण्यात आला.श्री. अण्णा बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधिकरणात बांधलेली ही पहिलीच दुमजली इमारत आहे व लवकरच लिफ्टची व्यवस्था करण्यात येईल व आमचे कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली! श्री.दिलीप गोसावी उपाध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले.
