*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक पंकज अंबिके लिखित अप्रतिम कथा*
*करी मामा –सोड्याचा बाटल्या आणि आयुष्याची झुंज*
सोड्याच्या बाटल्यांमधून फुललेलं आयुष्य
एक संघर्ष, एक प्रेमकथा आणि एका माणसाने कमावलेला मान
सन १९६२. कर्नाटकातील हुबळी शहरातील एका साध्या कुटुंबात मुकुंद अनंतराव करी यांचा जन्म झाला. घरात एकूण सात भावंडे होते. मोठं कुटुंब, मर्यादित उत्पन्न आणि रोजच्या जगण्याची धडपड होती. घरात प्रेम भरपूर होते, पण सुखसोयी कमी होत्या. लहानपणापासूनच मुकुंद यांना आयुष्य म्हणजे संघर्ष हे समजलं होते.
सात भावंडांमध्ये वाढताना त्यांनी वाटून खाणं, एकमेकांना आधार देणे आणि संकटांशी दोन हात करणे शिकून घेतले होते . पण नियतीने त्यांच्या साठी वेगळाच मार्ग आखून ठेवला होता.
काही वर्षांनी त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना इंदापूरला बोलावून घेतले . “इथे ये, काहीतरी काम कर. आयुष्याला दिशा मिळेल,” असा त्यांचा विश्वास होता. मुकुंद ह्यांनी तो विश्वास सार्थ करण्या चे ठरवले .
इंदापूर त्यांच्या साठी पूर्णपणे नवीन होते . भाषा वेगळी, लोक वेगळे, संस्कृती वेगळी. सुरुवातीला त्यांना मराठी नीट समजत नव्हती. अनेकदा लोकांच्या बोलण्याचा अर्थ समजत नसे. पण त्यांनी कधी हार मानली नाही. चेहऱ्यावर हास्य आणि मनात जिद्द घेऊन ते प्रत्येक दिवस जगत राहिले.
उपजीविकेसाठी त्यांनी एका खाजगी पेट्रोल पंपावर काम सुरू केले.सकाळपासून रात्रीपर्यंत वाहनांना इंधन भरणं, ग्राहकांशी नम्रपणे बोलणे, प्रामाणिकपणे काम करणे – हाच त्यांचा दिनक्रम झाला.
त्यांच्या प्रामाणिक स्वभावामुळे ग्राहक त्यांना ओळखू लागले. “तो कर्नाटकचा मुलगा खूप चांगला आहे,” अशी चर्चा होऊ लागली.
याच काळात त्यांच्या आयुष्यात एक सुंदर वळण आले .
एका कौटुंबिक कार्यक्रमात त्यांची भेट सुधा ह्यांच्याशी झाली. पहिली भेट साधी होती, पण त्या भेटीत काहीतरी वेगळं होते. सुधाच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि मुकुंदच्या डोळ्यांतील प्रामाणिकपणा दोघांनाही एकमेकांकडे नकळत खेचत होता.
काही दिवसांनी पुन्हा त्यांची भेट झाली, थोडं बोलणं सुरू झाले. बोलण्यातून मैत्री झाली, मैत्रीतून जिव्हाळा वाढला.
हळूहळू दोघांनाही जाणवलं की ही भावना केवळ मैत्रीची नाही.
पण त्या काळात प्रेमविवाह इतका सहज स्वीकारला जात नव्हता. त्यात वेगवेगळ्या कुटुंबं, भाषा आणि परंपरा – अशे अनेक प्रश्न समोर उभे होते.
दोघांनीही घाई केली नाही. एकमेकांवरचा विश्वास जपला.
सुधा म्हणायच्या “आपण आयुष्यभर एकत्र राहायचं असेल तर संयम ठेवावा लागेल.”
मुकुंद हसून म्हणाय चे,
“तुझा हात कधीच सोडणार नाही.”
दोघांनी आपल्या कुटुंबियांना समजाव ले. काहींनी विरोध केला, काहींनी प्रश्न विचारले, तर काहींनी वेळ मागितली. पण त्यांच्या नात्यातील प्रामाणिकपणा पाहून शेवटी सर्वांनी त्यांचा निर्णय स्वीकारला.
साध्या पद्धतीने त्यांचा विवाह झाला. त्या दिवसापासून सुधा केवळ पत्नी नव्हत्या. तर प्रत्येक संघर्षात खंबीरपणे उभी राहणारी जीवनसाथी बनल्या.लग्नानंतर संसार सुरू झाला. पैशांची चणचण होती. पण दोघांच्या चेहऱ्यावर कधी नाराजी नव्हती. छोट्याशा घरात मोठी स्वप्नं होती.
दरम्यान, मुकुंदच्या मोठ्या बहिणीने त्यांना वेळोवेळी मोठा आधार दिला. आर्थिक मदत, मानसिक धीर आणि योग्य मार्गदर्शन – त्यांच्या मुळे अनेक कठीण प्रसंग सहज पार झाले.
मुकुंद नेहमी म्हणाय चे,
“माझ्या बहिणीने मला फक्त आधार दिला नाही, तर उभं राहायला
शिकव ले.”
काळ पुढे सरकत गेला. पेट्रोल पंपावर नोकरी करताना त्यांच्या मनात स्वतःचा
व्यवसाय करण्याचं स्वप्न आकार घेऊ लाग ले. मोठा व्यवसाय करण्याइतकी
आर्थिक ताकद नव्हती. मग त्यांनी छोट्या पावलाने सुरुवात केली.
एक सोड्याचा गाडा सुरु केला.
पहिल्या दिवशी फारशी विक्री झाली नाही. पण दुसऱ्या दिवशी काही ग्राहक पुन्हा आले. कारण त्यांना फक्त सोडा आवडला नव्हता; त्यांना मुकुंद ह्यांचा हसतमुख स्वभाव आवडला होता.
ते प्रत्येक ग्राहकाला हसून स्वागत करायचे. लहान मुलांना प्रेमाने बोलायचे.
ज्येष्ठ नागरिकांचा आदर करायचे. गरिबाला कधी उधारीवरही सोडा द्यायचे.
हळूहळू त्यांचा सोड्याचा गाडा इंदापूरमध्ये प्रसिद्ध झाला. लोक म्हणू लागले,
“चला… करी मामांकडे जाऊ.”
आणी तेव्हापासून मुकुंद अनंतराव करी हे नाव मागे पडले.
संपूर्ण इंदापूर त्यांना एका नव्या नावाने ओळखू लागले…
करी मामा!
“हे नाव त्यांनी पैशाने नाही, तर माणुसकीने कमावलं होते” सोड्याच्या गाड्याभोवती नेहमी गर्दी असायची.
कोणी सोडा प्यायला यायचे, कोणी गप्पा मारायला, कोणी फक्त “करी मामा, कसे आहात?” एवढं विचारायला. करी मामा प्रत्येकाशी आपुलकीने बोलायचे
त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच त्यांचं खरं भांडवल होते. काळाच्या ओघात
त्यांच्या संसारात दोन सुंदर फुलं आली. एक मुलगी, एक मुलगा.
त्यांनी त्यांच्या परीने जेवढे शिकवता येईल तेवढे मुलांना शिकवले .
एखादा एक पेट्रोल पंपावर प्रसंग घडला .
एक दिवस पेट्रोल पंपावर एका ग्राहकाने कर्मचाऱ्याशी उर्मटपणे वागायला सुरुवात केली. मामांनी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. पण समोरचा ऐकायला तयार नव्हता. क्षणात शब्दांची चकमक झाली. आजूबाजूला गर्दी जमली. वातावरण तापले. मामांनी त्याचा हात झटकत ठाम आवाजात सांगितले, “इथे पैशाचा रुबाब नाही चालणार, माणुसकीने वागा.” काही क्षण परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटली, पण इतरांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. त्या दिवशी अनेकांनी त्यांच्या धाडसाचं कौतुक केले. हा प्रसंग त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाची साक्ष देऊन गेला.
काही वर्षांनी त्यांनी कर्मयोगी साखर कारखान्यात काम सुरू केले. साधा पगार, भाड्याचं घर आणि मोठ्या जबाबदाऱ्या. महिन्याचा शेवट येईपर्यंत पैशांची तारेवरची कसरत व्हायची. पण घरात कधी निराशेचं वातावरण नव्हते. चेहऱ्यावर नेहमी हास्य आणि ओठांवर एकच वाक्य, “आज कठीण आहे,
उद्या नक्की चांगलं होईल.” गाण्यांची प्रचंड आवड असल्याने आयुष्यातील कठीण कठीण प्रसंग गाणी म्हणत कधी सोडवले गेले कळलेच नाही.
भाड्याच्या छोट्याशा घरात संसार फुलत होता. प्रत्येक विटेसाठी, प्रत्येक रुपयासाठी त्यांनी घाम गाळला होता. सुट्ट्यांच्या दिवशीही अतिरिक्त काम करून पैसे साठवले होते. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर स्वतःचं छोटंसे घर उभं राहिले. त्या घराच्या भिंतींमध्ये सिमेंटपेक्षा जास्त मिसळलेला होता त्यांच्या कष्टांचा घाम आणी त्यांची स्वप्ने.
करी मामांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे प्रेमळ मन. सर्व भाचे-भाचींवर त्यांचा जीवापाड जीव आहे. आणी भाच्यांचंही त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे. कुणाला अडचण आली की, “मामा आहेत ना!” हा विश्वास पुरेसा असतो. आज तर त्यांच्या भाच्यांच्या मुलांनाही ते फक्त नातेवाईक नाहीत, तर मामा च वाटतात.
त्यांची मुलगी म्हणजे त्यांचा जीव आहे .लाडाने ते तिला “सोनू” म्हणायचे. वालचंदनगरला तिचं लग्न झालं, तेव्हा डोळ्यात आनंद होता, पण मनात मुलगी दूर जाण्याची हुरहूरही होती. ती माहेरी आली की घर पुन्हा हसून भरून जायचं. मुलीच्या प्रत्येक यशाचा त्यांना अभिमान वाटायचा. बाप-लेकीचं ते नातं शब्दांत मावणं कठीण होते.
स्वयंपाक ही त्यांची आणखी एक कला आहे. कोणत्याही परिस्थितीत घरच्यांना चविष्ट जेवण मिळालंच पाहिजे, हा त्यांचा हट्ट. त्यांच्या हातच्या जेवणाची चव आजही अनेकांच्या आठवणीत ताजी आहे.
त्यांच्या आयुष्याचा आधार होता गोंदवलेकर महाराजांवरील अखंड श्रद्धा. सुख असो वा दुःख, त्यांच्या ओठांवर नेहमी नामस्मरण असते. संकटं आली की ते म्हणायचे, “महाराज आहेत, ते मार्ग काढतील.”
“मात्र डिसेंबर २०१६ सालची ती रात्र त्यांच्या कुटुंबासाठी काळरात्र ठरली होती.
सर्व कुटुंब सांगलीला गेले होते ,तिथून येताना गोंदवल्यात महाराजांचा प्रसाद घेतला ,रात्री गाडी इंदापूरच्या दिशेने निघाली .घर अवघ्या १० किलोमीटर वर असतानाच गाडीला ५४ फाटा येथे अपघात झाला.
येथे झालेल्या भीषण कार अपघातात त्यांच्या पत्नी आणी थोरल्या बहिणीचे निधन झाले. एका क्षणात संसार उद्ध्वस्त झाला होता, आयुष्यभराची सोबत हरपली होती. घरातील हसणं हरवले होते . आयुष्याचा अर्थ निघून गेला होता .
त्यांच्या आयुष्यात न भूतो ना भविष्यती असा अघात घडला होता ,
बहिणीच्या रूपाने आधार गेला तर बायकोच्या रूपाने जीवनाची जीवन साथी गेली.
प्रसिद्ध कवी त्यांचे गाणे आठवते : !!भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी !!.
तिला विचारी राजा, “का हे जीव असे जोडावे?…का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना? @@
असा अघात कोणालाही खचवून टाकेल. पण करी मामा कोसळले नाहीत.
डोळ्यांत अश्रू होते, पण पाय मागे हटले नाहीत. मुलाचं शिक्षण पूर्ण केले. नोकरी प्रामाणिकपणे निवृत्तीपर्यंत केली. स्वतःच्या दुःखाचं ओझं मनात ठेवूनही इतरांना आधार देत राहिले.
आजही ते तितक्याच साधेपणाने जगतात. चेहऱ्यावरचं हास्य तसंच आहे. संकटांनी त्यांना कठोर केलं नाही, तर अधिक माणुसकी शिकवली.
करी मामांची कथा ही केवळ एका व्यक्तीची जीवन कहाणी नाही. ती संघर्ष, स्वाभिमान, प्रेम, नात्यांची ऊब, श्रद्धा आणि पुन्हा उभं राहण्याच्या जिद्दीची कहाणी आहे.
अडगळीत पडलेल्या सोड्याच्या बाटल्या जशा पुन्हा एकदा फसफसतात, तसंच संकटांनी वेढलेल्या आयुष्यातही करी मामांनी आशेचा झरा कधी आटू दिला नाही.
त्यांचा हा संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न…
लेखक : पंकज प्रदीप अंबिके
बारामती , मोबाईल नं : ८३०८५३७५८३
_________________________
*संवाद मीडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
*Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
*Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.*
*• Duration : 4.5 Years*
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
👉 *सर्व मुलींना 100% ट्युशन फी आणि परीक्षा फी माफी.(शासन नियमानुसार)*
*पत्ता:*
*प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712*
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204353/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
