You are currently viewing पावसाच्या थेंबांसोबत कवितांचे शब्दही बरसणार…!

पावसाच्या थेंबांसोबत कवितांचे शब्दही बरसणार…!

*कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगावने आयोजित केला पावसाळी कविता वाचन, गायनाचा कार्यक्रम*

सावंतवाडी / मळगाव :

पावसाच्या थेंबांसोबत कवितेचे शब्दही बरसणार!
पावसाळ्याच्या ओलसर संध्याकाळी मनाला भिजवणारी साहित्यिक मेजवानी घेऊन कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगावने *”काव्यांजली”* हा विशेष काव्य कार्यक्रम मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता ग्रंथालयाचे रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृह, मळगाव येथे आयोजित केला असून काव्यरसिकांनी या शब्दयात्रेचा भाग होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आग्रहाचे आवाहन वाचन मंदिरातर्फे करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमात पावसाळी कवितांचा गजर, कवी-लेखकांच्या स्वरचित कवितांचे जिवंत सादरीकरण आणि काव्यावर आधारित मधुर गायन रसिकांना मंत्रमुग्ध करेल. शब्द, सूर आणि संवेदनांचा त्रिवेणी संगम येथे अनुभवायला मिळेल. पावसात भिजणं शरीराला, आणि कवितेत भिजणं मनाला… या दोन्हीचा आनंद एकाच संध्याकाळी अनुभवण्याची सुवर्णसंधी काव्यरसिकांनी घ्यावी आणि ही सायंकाळ शब्दसुरांनी गंधित करण्यासाठी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा