You are currently viewing कुडाळ नगरपंचायत 58 उमेदवारांचे 62 उमेदवारी अर्ज दाखल 

कुडाळ नगरपंचायत 58 उमेदवारांचे 62 उमेदवारी अर्ज दाखल 

कुडाळ

कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या शिवसेनेचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी काँग्रेस शिवसेनेच्या नगरसेविका प्रज्ञा राणे यांनी भाजपा मधुन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीलाध्यक्षा पुजा पेडणेकर यांनी काँग्रेस मधुन व शिवसेनेच्या माजी सभापती शिल्पा घुर्ये यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपाला बंडखोरीला सामोरे जावे लागले त्यामुळे चुरस निर्माण होणार असुन सोमवारी व मंगळवारी 58 उमेदवारांनी 62 उमेदवारी अर्ज दाखल केले.

मंगळवारी कुडाळ नगरपंचायत कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र मठपती यांचे उपस्थितीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत संपन्न झाली. प्रभाग क्रमांक 1 कविलकट्टा (सर्व साधारण महीला) मधुन ज्योती जळवी (शिवसेना), रजंना जळवी (काँग्रेस), सकु आकेरकर (भाजप), मनाली वेंगुर्लेकर (शिवसेना) वैशाली बावकर (अपक्ष)
प्रभाग क्र. 2 भैरववाडी (सर्व साधारण महीला)अनुजा राऊळ (शिवसेना), पुजा पेडणेकर (काँग्रेस), नयना मांजरेकर ( भाजप व अपक्ष)
प्रभाग क्र. 4 बाजारपेठ (सर्वसाधारण महीला) सोनल सावंत (काँग्रेस), रेखा काणेकर (भाजप), मृण्मयी धुरी ( भाजप व अपक्ष), श्रृती वर्दम (शिवसेना).
प्रभाग क्र 5 कुडाळेश्वर वाडी (सर्व साधारण) प्रविण राऊळ (शिवसेना), अभिषेक गावडे (भाजप), रोहन काणेकर (काँग्रेस), अश्विनी परब (अपक्ष), सुनील बांदेकर (अपक्ष), रमाकांत नाईक (मनसे)
प्रभाग क्र 6 गांधीचौक (सर्व साधारण महीला)
शुभांगी काळसेकर (काँग्रेस), देविका बांदेकर (शिवसेना), प्राजक्ता बांदेकर (भाजप), अदिती सावंत (भाजप व अपक्ष)
प्रभाग क्र 7 आंबेडकर नगर (सर्वसाधारण ) विलास कुडाळकर (भाजप), अनुप जाधव (भाजप), मयुर शारबिद्रे (काँग्रेस), भुषण कुडाळकर (शिवसेना)
प्रभाग क्र 8 मस्जिद मोहल्ला (सर्वसाधारण महीला) आफरीन करोल (काँग्रेस), रेवती राणे (भाजप),रूखसार शेख (काँग्रेस), मानसी सावंत (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र 9 नाबरवाडी (सर्वसाधारण महीला) साक्षी सावंत (भाजप), श्रेया गवंडे (शिवसेना)
प्रभाग क्र 11 वाघ सावंत टेंब (अनुसूचित जाती ) सिद्धार्थ कुडाळकर (काँग्रेस), राजीव कुडाळकर (भाजप), गुरूनाथ गडकर (शिवसेना).
प्रभाग क्र 12 हिंदु काॅलनी (सर्वसाधारण) संध्या तेरसे (भाजप), काका कुडाळकर (राष्ट्रवादी), अरूण गिरकर (काँग्रेस)
प्रभाग क्र 13 श्रीराम वाडी (सर्वसाधारण महीला ) विमल राऊळ (काँग्रेस), शिल्पा घुर्ये (अपक्ष), तेजस्विनी वैद्य (भाजप), सई काळप (शिवसेना)
प्रभाग क्र 14 अभिनव नगर (सर्वसाधारण) मंदार शिरसाट (शिवसेना), प्रज्ञा राणे (भाजप),केतन पडते (काँग्रेस),
प्रभाग क्र 15 मधली कुंभार वाडी (सर्वसाधारण) प्रशांत राणे (भाजप), योगेश राऊळ (अपक्ष), उदय मांजरेकर (शिवसेना), गणेश भोगटे (काँग्रेस)

या चार प्रभागाची निवडणूकीला स्थगिती. –
न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण स्थगिती मिळाल्याने प्रभाग क्र. 3 लक्ष्मीवाडी (नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला) अश्विनी पाटील (शिवसेना), चांदणी कांबळी (भाजप), प्रभाग क्र. 10 केळबाई वाडी (नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला) प्रांजल कुडाळकर (शिवसेना), रीना पडते (भाजप), प्रभाग क्र 16 एमआयडीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग ) किरण शिंदे (शिवसेना), सुधीर चव्हाण (भाजप), प्रभाग क्र 17 सांगिर्डेवाडी (नागरीकांचा मागास प्रवर्ग) तेजस्वी परब (शिवसेना), सुनील भोगटे (राष्ट्रवादी), कृष्णा मेस्त्री (भाजप) यांच्या निवडणुकानां स्थगिती दिली आहे.

बुधवारी होणार छाननी-
बुधवारी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रीया पार पडणार आहे. तर दि. 13 डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी ठेवला आहे.
सदरचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, अरविंद मोंडकर, काका कुडाळकर तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + sixteen =