गुणवंताचे कौतुक करणारी बलस्थाने उमरगाची कर्मभूमी देत आहे असे प्रतिपादन समाज सेवक भूमिपुत्र वाघ केले. अनिकेत बिभीषण सुरवसे यांच्या सत्कार प्रसंगी भूमिपुत्र वाघ बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अनिल मूडमे आणि प्रोफेसर राजेंद्र इंगोले सर हे होते. अनिकेत बिभीषण सुरवसे यांनी निट 2026 परीक्षेत 540 गुण मिळऊन ऑल इंडिया रँक 49983 व एस सी कॅटेगरी रँक -1450 अशी घेऊन घवघवीत यश संपादन केले. म्हणून अनिकेत सूरवसे यांच्या विशेष सत्काराचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिजाऊ चौक उमरगा या ठिकाणी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उमरगा शहरातील प्राध्यापक, शिक्षक, वकील, इंजिनीयर असे गुणवंत नामवंत मित्रगण उपस्थित होते सोबत आजी- श्रीमती कमलबाई नरसिंगराव सुरवसे,वडील -श्री बिभीषण नरसिंगराव सुरवसे आई-सौ जयश्री बिभीषण सुरवसे यांचाही याप्रसंगी सत्कार आयोजित केला होता.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री इंगोले सर यांनी भविष्यात फक्त एम बी बी एस करून न थांबता पुढे पी जी करून गोरगरीब जनतेसाठी चांगली आरोग्यसेवा करावी अशी इच्छा व्यक्त केली. अनिल मोडवे यांचा वाढदिवस याप्रसंगी साजरा करण्यात आला त्यांनीही अनिकेत यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजन गोविंद कुंभार यांनी केले या प्रसंगी शशिकांत डांगे,सचिन डांगे,अंकुश ईदगार,रोहीदास मुळजे, श्री दयानंद पाटील सर, पंडित शिंदे,प्रा. नाबदे,रामभाऊ पतंगे ई मित्र परिवार उपस्थित होते याप्रसंगी अनिकेत यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत आणि सत्कार केला.
