You are currently viewing रागावलात देवा?
Oplus_16908288

रागावलात देवा?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रागावलात देवा?*

॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

 

संतजन भेटीवृत्त।सहजची पुशियेले

म्हणून का रागावला।आणि तोंड फिरवले ।।

 

देव आहात तुम्ही ।भोळे भक्त आहो आम्ही

काही चुकलं भक्तांचं । समजून घ्या हो तुम्ही।।

 

कली युग आहे चालू ।अनुभव येती खूप

कोणीही येऊन आम्हा ।सहजची फसवती।।

 

विज्ञानाचे युग आहे। कस लावून पहावे

मगच मान्य करावे अशी येथे रीतआहे ।।

 

तुला काय सांगू देवा। अठ्ठावीस युगे उभा

आमचे जीवन हीच ।युगे वाटतात आम्हा ।।

 

तरीही देवा सांगते । चूक भूल द्यावी घ्यावी

आषाढीच्या एकादशीला । उराउरी भेट व्हावी।।

पांडुरंग।पांडुरंग।।

 

विद्या रानडे, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा