You are currently viewing मोरगाव-आडाळी ते झोळंबे दुसऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पायी वारीचे आयोजन

मोरगाव-आडाळी ते झोळंबे दुसऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पायी वारीचे आयोजन

मोरगाव-आडाळी ते झोळंबे दुसऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पायी वारीचे आयोजन

२५ जुलै रोजी श्री वंशदेव मंदिरातून सकाळी ७ वाजता होणार प्रारंभ; वारकऱ्यांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन

दोडामार्ग : प्रतिनिधी

दुसऱ्या आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने मोरगाव-आडाळी येथून श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, झोळंबे येथे शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या वारीत परिसरातील वारकरी, भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वारीचा प्रारंभ सकाळी ७ वाजता मोरगाव (टाकवाडी) येथील श्री वंशदेव मंदिरातून होणार असून, “राम कृष्ण हरी” तसेच “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या नामगजरात भाविक झोळंबे येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे प्रस्थान करणार आहेत.

आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन ही आनंदवारी आयोजित करण्यात आली असून, सर्व माऊलींनी भक्तिभावाने सहभागी होऊन वारीचा आनंद घ्यावा, असे आयोजकांनी नमूद केले आहे.

वारीबाबत अधिक माहितीसाठी पप्पू ठाकूर (९४२०२०४०२९), बंटी चव्हाण (७४९८५७९३२४), सागर धुरी (९४०३०५१३६२), प्रदीप ठाकूर (९४२११५१३६५) आणि हरेष पिरणकर (९४२१५३८४२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा