You are currently viewing कारिवडे कुंभारवाडीत २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कारिवडे कुंभारवाडीत २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कारिवडे कुंभारवाडीत २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रवीण चंद्रकांत खडपकर याचा राहत्या घरी मृत्यू; सावंतवाडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

सावंतवाडी

कारिवडे कुंभारवाडी येथील २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी उघडकीस आली. प्रवीण चंद्रकांत खडपकर असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास प्रवीणचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर गेले होते. प्रवीण दुपारी दोन वाजताच्या शिफ्टसाठी कामावर जाणार होता. मात्र दुपारी एकच्या सुमारास त्याची आई घरी परतली असता, बेडरूममधील लोखंडी वाश्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रवीण आढळला.
कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मुळीक, पोलीस हवालदार शिंदे आणि सुरेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा