You are currently viewing गोळवण-कुमामे-डिकवल येथे लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले व हयात दाखले प्रमाणपत्र उपलब्धतेकरिता कॅम्प

गोळवण-कुमामे-डिकवल येथे लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले व हयात दाखले प्रमाणपत्र उपलब्धतेकरिता कॅम्प

मालवण :

 

ग्रा. पं. गोळवण-कुमामे-डिकवल व सद्गुरू समर्थ महा ई-सेवा केंद्र, वराड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १९/०४/२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल येथे सकाळी १०.०० वा. शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत अपंग, निराधार परितक्ता, विधवा लाभार्थी यांना उत्पन्न दाखले व हयात दाखले प्रमाणपत्र एकाच वेळी उपलब्ध करून देण्याकरिता कॅम्प आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास मंडळ अधिकारी पेंडुर श्री. उमेश राठोड साहेब, महा ई-सेवा केंद्र वराड चे केंद्र चालक श्री. राजन माणगावकर व त्यांचे सर्व सहकारी, सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, सौ. मेघा गावडे, सौ. प्राजक्ता चिरमुले, तलाठी श्री. सी. एम. कांबळे भाऊ, हेदुळ कोतवाल श्री. प्रमोद गरुड, डिकवल येथील श्री. मनोहर घन:शाम गावडे, LIC चे प्रतिनिधी श्री. नाईक, ग्रा. पं. कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्री. रामकृष्ण नाईक, श्रीम. करुणा राणे, श्री. दत्ताराम परब आदी उपस्थित होते. सदर आयोजित कॅम्प मध्ये गाव गोळवण, कुमामे, डिकवल येथील सुमारे १२५ लाभार्थ्यांचे उत्पन्नाचे दाखले काढण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा