घोणसई गावातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश
*घोणसई गावात भाजपाची ताकद वाढली; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश*
वाडा
वाडा तालुक्यातील घोणसई गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. वाडा येथील भाजपा कार्यालयात आयोजित प्रवेश सोहळा भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, पालघरचे खासदार डॉ.हेमंत सवरा, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, भिवंडी ग्रामीण विधानसभा संयोजक मंगेश पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर तसेच भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख विचारसरणी व सक्षम संघटनावर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केल्याची भावना यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या प्रवेशामुळे वाडा तालुक्यात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून आगामी काळात पक्षाला अधिक उभारी मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
प्रवेशकर्त्यांमधे कांचना शेलार, अंजू पाटील, अरुणा पाटील, दर्शना भोईर, अर्चना घरत, योगिता पाटील, वैशाली पाटील, कृपती पाटील, वंदना शेलार, प्रीती भोईर, अनिता पाटील, बेबी पिलाणे, प्रज्ञा पाटील, शिमला रविदास, हरिश्चंद्र घरत, मनोहर शेलार, रमेश पाटील, भरत जाधव, हरिश्चंद्र पाटील, नारायण पाटील, पुंडलिक पाटील, रमेश रविदास, अक्षय सोनार, रमेश मुकणे, निलेश धोगडे, गुरुनाथ वाघर, संतोष मुकणे, भावेश गवाळे, विश्वनाथ पाटील, पंकज शेलार, विक्रांत शेलार, आकाश शेलार, देवेंद्र पाटील, पारस शेलार, अतुल पाटील, केतन पाटील, निकेत पाटील, सौरभ पाटील, आझाद पाटील, सुमित पाटील, जयेश भोईर, विकास चौधरी, अक्षय गुप्ता, सुनील मुकणे, सुजित मुकणे, राजू कडव, प्रवीण शेलार, अमर शिर्के, रोहित पाटील, अनिकेत पाटील, कुणाल पाटील आणि हर्षल पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
