You are currently viewing सावंतवाडी न्यू सबनीसवाडा येथे शिवजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न

सावंतवाडी न्यू सबनीसवाडा येथे शिवजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथील न्यू सबनीसवाडा मॉडर्न कॉलनी येथे यावर्षी प्रथमच शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात मा. अशोक दळवी आणि बाबू कुडतरकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे पुष्पागुच्छ देऊन कॉलनीचे अध्यक्ष प्राध्यापक रमाकांत गावडे यांनी स्वागत केले आणि प्रस्ताविका मध्ये शिवाजी महाराज्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. महाराजांकडे नियोजन हे प्रखर शस्त्र होते. त्याचा उपयोग करून महाराजांनी राज्य चालवले असे उदगार त्यांनी काढले. यानंतर माजी नगरसेवक श्री बाबू कुडतरकर यांनी आपले विचार मांडले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक श्री पेडणेकर, नगरसेविका श्रीम. भारती मोरे आणि नंदू रेडकर, अनेक शिवप्रेमी, तसेच कॉलनीतील सर्व नागरिक उपस्थित होते. यावेळी श्री बाबू कुडतरकर यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यकांत सांगेलकर यांनी केले तर आभार श्री गजानन सावंत सर यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 14 =