आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची स्थापना ही एक ऐतिहासिक घटना – जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे
सिंधुदुर्गनगरी
आंतरराष्ट्रीय न्यायलयाचे विशेषतः शासन पुरस्कृत गुन्हे, युद्ध गुन्हे यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे महत्व अनन्य साधारण असल्याचे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ सुधीर देशपांडे यांनी व्यक्त केले. त्यांनी आतरराष्ट्रीय न्यायालय याबाबतची संकल्पना, माहिती व कार्यपद्धती यावर भाष्य केले, अमेरिकन राज्य घटनेच्या निर्मितीत कोणत्याही लोकशाही देशातील कायदा हा त्या देशाच्या घटनेच्या तत्वाशी विसंगत असेल तर तो पूनर्विलोकन करणेचा व तो रद्द करण्याचा अवैध जाहिर करण्याचा अधिकार त्या त्या देशांच्या सर्वाच्च न्यायालयाला असल्याचे म्हणाले. त्याबाबत सन १८०३ साली अमेरीकेच्या सुप्रीम कोर्टातील मार्बरी विरुद्ध मेडिसन या ऐतिहासिक निर्णयाचा उहापोह केला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व वकील संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 17 जुलै रोजी जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अति. सत्र न्यायाधीश, एस. एस, इंदलकर, सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, श्रीमती एस. ए. कानशिडे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी आर, व्ही. नडगदल्ली, २रे सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. जे. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र & गोवाचे अध्यक्ष संग्राम देसाई, अॅड. परिमल नाईक, अॅड. राजेंद्र रावराणे व इतर सर्व विधीज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना अॅड. परिमल नाईक, म्हणाले न्यायदिन का साजरा केला जातो याबाबत माहिती दिली. अॅड. राजेंद्र रावराणे यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा करण्याचे कारण, आंतरराष्ट्रीय न्यायदिनाची स्थापना, कार्य, गरज याबाबत आपले विचार मांडले. आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचे स्वरुप पाहता आंतरराष्ट्रीय न्याय व्यवस्थेचे महत्व प्रचंड प्रमाणात वाढल्याचे अधोरेखित केले. सर्व स्तरावरील न्यायव्यवस्थेची आवश्यकता व महत्व विशद करताना त्यांनी सावंतवाडी संस्थान काळात चालत असलेल्या न्यायनिर्णय प्रक्रियेची थोडक्यात माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक लोकअभिरक्षक अॅड. श्वेता तेंडुलकर यांनी केले.
