इंडियास्किल्स स्पर्धा राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू
जागतिक पातळीवर चमकण्याची सिंधुदुर्गकरांना सुवर्णसंधी !
सिंधुदुर्गनगरी
जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरुणांना त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. इंडियास्किल्स स्पर्धा ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धा असून, देशातील प्रतिभावान युवक-युवतींना विविध व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य क्षेत्रांमध्ये आपली गुणवत्ता, कौशल्य आणि प्राविण्य प्रदर्शित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देत या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे स्पर्धक राष्ट्रीय निवड प्रक्रियेतून पुढे जातात आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वर्ल्डस्किल्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवतात.
राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC- National Skill Development Council) यांच्याकडून India Skills Competition २०२६-२७ स्पर्धेकरिता नावनोंदणी सुरु झालेली आहे. २०२७ मध्ये आयोजित केलेल्या India Skills Competition २०२६-२७ स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने कौशल्य क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, Sector Skill Council, विविध औद्यागिक आस्थापना यांच्या सहकार्याने India Skill Competition आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील India Skills Competition २०२६-२७ करिता नामांकनासाठी पाठविण्यात येतील.
त्यानुसार सदर India Skills Competition २०२६-२७ मधील जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
पात्रता निकष:-
India Skills Competition २०२६-२७ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ५६ क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, २००३ किंवा तद्भनंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, Cyber Security, Industry ४.०, Mechatronics, Robot Systems Integration या Team स्किल्सकरिता उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, २००३ आणि Autonomous Mobile Robotics, Concrete Construction Work, Landscape Gardening या Team स्किल्सकरिता उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, २००६ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. त्यानुषंगाने India Skills Competition २०२६-27 स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्रांची यादी संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
सन २०२६-२7 मध्ये आयोजित करण्यात येणा-या India Skills Competition २०२६-२7 स्पर्धेकरिता प्रतिभासंपन्न, कुशल इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी सदर कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देवून जास्तीत जास्त नाव नोंदणी करुन आपला सहभाग निश्चित करावा. अधिक माहितीसाठी Sindhudurg Rojgar या Facebook, Instagram आणि Whatsapp Channels ला भेट द्यावी. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौ.वि.रो.व उ.मा. अधिकारी, अमिन इ. तडवी, यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – 02362-228835 ईमेल आयडी- sindhudurgrojgar@gmail.com
