You are currently viewing सनदी लेखापाल परीक्षेत यश

सनदी लेखापाल परीक्षेत यश

सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील सद्यस्थितीत नोकरी व शिक्षणानिमित्त मुंबईस्थित असणारी सौ.नम्रता महेंद्र राऊत हिने सनदी लेखापाल(ca) परीक्षेत प्रावीण्य मिळवलेले आहे.
सनदी लेखापाल(ca) परीक्षेचा नुकताच निकाल जाहिर झाला.यात सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड हेदुलवाडी येथील मधुसुधन राऊत यांची सून नम्रता महेंद्र राऊत हिने ह्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.उल्लेखनीय गोष्ट अशी की नोकरी आणि संसार ही दुहेरी जबाबदारी सांभाळत नम्रता चार्टर्ड अकाऊंटंट सारखी अतिकठीण श्रेणीत मोडणारी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.तिचे गावातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =