You are currently viewing वेंगुर्ले शिवसेनेच्या तालुका संघटनेत नवे चेहरे; गुणाजी दळवी तालुकाप्रमुख

वेंगुर्ले शिवसेनेच्या तालुका संघटनेत नवे चेहरे; गुणाजी दळवी तालुकाप्रमुख

वेंगुर्ले शिवसेनेच्या तालुका संघटनेत नवे चेहरे; गुणाजी दळवी तालुकाप्रमुख

अजित राऊळ शहरप्रमुख, सिद्धेश (भाई) परब उपजिल्हाप्रमुख; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रांचे वितरण

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वपूर्ण बदल करत तालुकाप्रमुख, शहरप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुख पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमात या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली.
सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले तालुकाप्रमुखपदी गुणाजी उर्फ बाळा दळवी, शहरप्रमुखपदी अजित राऊळ आणि उपजिल्हाप्रमुखपदी पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांची नियुक्ती जाहीर केली.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, संपर्कप्रमुख बाळा चिंदरकर, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, काका कुडाळकर, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
पक्षांतर्गत काही कारणांमुळे वेंगुर्ले तालुका कार्यकारिणी आणि तालुकाप्रमुख पद यापूर्वी बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून विद्यमान पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता पक्षसंघटना अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मंत्री उदय सामंत यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, शिवसेनेची संघटना तळागाळात अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा