बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण व त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे. या योजनेचा प्रशिक्षण कालावधी 11 महिने आहे. विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या आधार सिडींग बैंक खात्यात DBT द्वारे थेट जमा होईल. प्रशिक्षणार्थीने 11 महिन्याचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आस्थापनेकडून अनुभव प्रमाणपत्र प्राप्त होईल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेणाऱ्या 12 वी पास उमेदवारांना 6 हजार रुपये, आयटीआय व पदविका उमेदवारांना 8 हजार रुपये, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना 10 हजार रुपये याप्रमाणे दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. उमेदवारांची वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे असावे. शिक्षण चालू असणारे व नोकरी करत असणारे उमेदवार योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. तसेच NAPS किंवा MAPS योजनांचा लाभ घेतलेले उमेदवारही या योजनेसाठी पात्र नसतील. तरी या विभागाच्या सुध्दा https://www.cmykpy.mahaswayam.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेटी देऊन किंवा दुरध्वनी क्रमांक 02362-228835 किंवा जिल्हा समन्वयक प्रितेश गजानन परब मो. नं. 7066387310 व सिध्देश गजानन घाडीगावकर मो. नं. 7263837143 यांच्याशी संपर्क करावा. तसेच Fb व Insta पेज Sindhudurgrojgar यावर भेट द्यावी.
