You are currently viewing झिरमिर धार
Oplus_16908288

झिरमिर धार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

झिरमिर धार

 

झिरमिर धारेत

सोडू या होडी

करू या सख्यांनो

गंमत थोडी!!

 

झिरमिर धारांची

न्यारीच खुमारी

थेंब थेंब झेलतंय

पानांची स्वारी.!!

 

झिरमिर धारांत

जरीकाठ भिजतो

चेह-यावर बटांची

महिरप सजवतो..!!

 

झिरमिर पाऊस

मनातही पडतो

आठवांच्या कळ्यांना

अलगद फुलवतो..!!

 

झिरमिर धारांचा

न्याराच तो थाट

झुळझुळ पाणी

काढतं वाट..!!

 

झिरमिर धारेत

माहेर आठवतं

जवळ घेतं मायेने

विचारपूस करतं!!

 

झिरमिर धारा

डोळ्यांत श्रावण

वाट बघते दारी

येणार कधी साजण!!

 

झिरमिर धार

शब्दांची सर

थांबेनाच कशी

घालते आवर. ..!!

_____________________

अरुणा दुद्दलवार@✍️💦

प्रतिक्रिया व्यक्त करा