कणकवली / प्रतिनिधी :
कोल्हापूर येथे २९ जून २०२६ रोजी आयोजित प्रोॲक्टिव्ह वैदिक गणित स्पर्धेत विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल, कणकवलीचा विद्यार्थी कृष्ण बंडागळे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतील तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत कृष्णने अवघ्या १० मिनिटे ५२ सेकंदांत सर्व गणिती प्रश्न अचूकपणे सोडवत पैकीच्या पैकी गुण मिळवून आपल्या बुद्धिमत्तेचा आणि वैदिक गणितावरील प्रभुत्वाचा ठसा उमटवला.
कृष्णच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक श्री. वणवे, विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. दिव्या सावंत, पर्यवेक्षिका सौ. श्रुती बावकर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
