*दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना ग्रामपंचायत कसाल येथे शैक्षणिक साहित्य वाटप*
सिंधुदुर्ग
महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसा व कोकण कला व शिक्षण विकास संस्था माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कसाल येथे दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा संपन्न झाला.या मेळाव्यामध्ये महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वयक श्री अनिल शिंगाडे सर, कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांचे प्रतिनिधी मा. समीर शिर्के सर,प्रकाश वाघ सर, सुनील तांबे सर,दीक्षा तेली मॅडम,दुर्वा निर्गुण मॅडम,मा.सुनील कांबळे सर, कर्मचारी प्रसन्ना शिर्के मॅडम,विशाखा कासले मॅडम, हर्षद खरात, रोहन तांबे, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचे स्वागत करून झाली.दिव्यांग बांधवांना विविध योजनाची माहिती व दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.हा मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर यांनी विविध योजनांचे मार्गदर्शन केले व विविध योजनांचे फायदे सांगितले. तसेच दिव्यांग बांधवांना घरपट्टीमध्ये 50% सवलत मिळते याबद्द्ल मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांचे प्रतिनिधी समीर शिर्के यांनी दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. व कोकण कला व शिक्षण विकास संस्था या NGO बद्दल थोडक्यात माहिती दिली. त्याचप्रमाणे दीक्षा मॅडम, निर्गुण मॅडम,सुनील तांबे सर, कांबळी सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.त्यानंतर कोकण कला व शिक्षण विकास संस्था या संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने दिव्यांग बांधवांना छत्री वाटप करण्यात आले.या कार्यक्रमालामध्ये 70 हून जास्त दिव्यांग व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकी संस्था व संदीप खानोलकर यांचे बहुमुलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश वाघ सर यांनी केले. मेळाव्याला लाभलेल्या सर्व दानशूर व्यक्तींचे आभार व्यक्त करण्यात आले. श्री अनिल शिंगाडे सर यांनी उपस्थित त्यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले
