देवगड:
तारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्था मर्यादित या संस्थेचे संचालक धनंजय तुकाराम जोशी यांच्या मातोश्री श्रीमती सुहासिनी तुकाराम जोशी यांनी दि.९ जुलै २०२६ रोजी पुणे मुक्कामी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांचे अल्प आजाराने निधन झाले त्यावेळी त्या ७० वर्षांच्या होत्या. श्रीमती सुहासिनी जोशी यांनी कित्येक वर्षे देवगड परिसरात जन्मजात मुलांना आंघोळ घालण्याचे अविरत कार्य केले. त्यांना कोणी मोबदला देवो नदेवो पण आपल्या घरचं बाळ समजून त्यांनी ही सेवा केली. पतीच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी पांच मुलांना काबाडकष्ट करून चांगले शिक्षण दिले. एका बाजूला आपली अविरत सेवा सुरू ठेवली. त्यांनी नेहमीच तारामुंबरी परिसरात संपन्न होत असलेल्या धार्मिक कार्यात सक्रिय भाग नोंदवला. त्यांच्या या आकस्मिक निधनाबद्दल प.पू. गुरूदास माऊली राऊळ महाराज दत्तप्रसाद मंडळयाचे कार्याध्यक्ष यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. श्रीमती जोशी यांच्या पश्चात मुलगा धनंजय, विवाहित चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर तारामुंबरी येथील सागर किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. त्यांच्या निधनाने तारामुंबरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प.पू. गुरूदास माऊली श्री राऊळ महाराज कार्याध्यक्ष दत्तप्रसाद मंडळ मुलुंड यांनी सहवेदना व्यक्त केला आहेत.
